• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उष्णतेची भीषण लाट; नागरिकांनी सतर्क राहावे — नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

अहिल्यानगर : प्रतिनिधी

राज्यासह अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उद्यापासून उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता अहिल्यानगर प्रभाग क्रमांक १ चे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

RelatedPosts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

दुपारच्या वेळेत सूर्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढत असून रस्त्यांवर उष्ण वारे वाहत आहेत. यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मजुरी व इतर कामांसाठी उन्हात फिरणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. सागर बोरुडे यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ. सागर बोरुडे म्हणाले की, “उष्णतेची ही लाट अत्यंत धोकादायक ठरू शकते. अनेक नागरिक उष्माघात, डिहायड्रेशन, चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा आणि त्वचेच्या विकारांनी त्रस्त होत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून वेळोवेळी पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.”

त्यांनी नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो बाहेर पडणे टाळावे, हलके व सैल कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी किंवा रुमाल घालावा तसेच लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारख्या पेयांचे सेवन करावे असा सल्लाही दिला. बाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये लहान मुलांना एकटे सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शहरातील रुग्णालयांमध्ये उष्णतेमुळे त्रस्त नागरिकांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. डॉक्टरांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून शरीरात अशक्तपणा जाणवणे, सतत घाम येणे, डोके गरगरणे किंवा ताप येणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे सांगितले आहे.

अहिल्यानगर शहरातील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन शेवटी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी केले आहे.

Tags: Amar Pathare
Previous Post

१८ मे रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके; नागरिकांनी सतर्क राहावे

Next Post

सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

Related Posts

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता
ताज्या घडामोडी

बाळगंगा प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी १,०८९ कोटींच्या प्रस्तावास मान्यता

September 30, 2026
17
ताज्या घडामोडी

जलतारा व वनराई बंधारे उभारणीसाठी १ ते १० ऑक्टोबरदरम्यान विशेष मोहीम

September 30, 2026
7
ताज्या घडामोडी

पाळये दशक्रोशीत वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात तीव्र आंदोलन; २ ऑक्टोबरला उपोषण

September 30, 2026
5
खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी
ताज्या घडामोडी

खासगी रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांच्या दरांची FDA कडून पडताळणी

September 30, 2026
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन
ताज्या घडामोडी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ब्रह्मपुरीत काँग्रेसचे आंदोलन

September 30, 2026
19
ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी
ताज्या घडामोडी

ब्रह्मपुरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा; तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

September 30, 2026
12
Next Post
सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

सुरेशदादा जैन औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयात रक्तदान शिबिरं संपन्न

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In