• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहरातील रस्त्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांत संतापाची लाट

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहरातील रस्त्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांत संतापाची लाट
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

शहादा, दि. १५ (प्रतिनिधी)

शहादा शहरातील दोंडाईचा रोडसह प्रमुख रस्ते आणि नवीन वसाहतींमधील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकेकाळी चांगल्या स्थितीत असलेले रस्ते आता मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापले असून, वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

विशेष म्हणजे, अलीकडेच करण्यात आलेले काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणाचे रस्तेही उखडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या कामामुळे लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप केला आहे.

दोंडाईचा रोड बनला ‘मृत्यूचा सापळा’

वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्थानक दरम्यानचा दोंडाईचा रोड सध्या अपघातप्रवण ठरला आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांची खोली लक्षात न आल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत असून काही वाहनधारक जखमीही झाले आहेत. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक बनले आहे.

नवीन वसाहतींतील रस्त्यांचीही दुरवस्था

शहरातील नव्याने विकसित झालेल्या वसाहतींमध्ये लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या रस्त्यांचे डांबर गत पावसाळ्यातच निघून गेले असून खडी उघडी पडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बस स्थानक या मुख्य मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी.
  • केवळ डागडुजी न करता दोंडाईचा रोडसह इतर प्रमुख रस्त्यांचे नव्याने मजबुतीकरण करावे.
  • निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांची चौकशी करून कारवाई करावी.

“मोठी जीवितहानी होण्याची वाट न पाहता पालिका प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करावी,” अशी मागणी वाहनधारक आणि नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने समस्येकडे त्वरित लक्ष न दिल्यास विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी एल्गार कष्टकरी संघटनेचे धरणे आंदोलन

Next Post

सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
19
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In