• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शहादा, दि. १५
नांदेड येथील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील सेवक व उपोषणकर्ते स्व. माणिक उद्धव निलेवाड यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्व. माणिक निलेवाड हे सन २००६ पासून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात कार्यरत होते. २०२२ पासून ते कायम सेवा पदावर कार्यरत होते. सुरुवातीला त्यांना नियमित वेतन मिळत होते; मात्र काही महिन्यांपासून कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने त्यांचे वेतन बंद केले. या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी त्यांनी उपोषण सुरू केले होते. उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

RelatedPosts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने आरोप करण्यात आला आहे की, संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा अपमान करून त्यांना मानसिक त्रास दिला आणि आत्महत्येस प्रवृत्त केले. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागण्या

  • स्व. माणिक निलेवाड यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर तातडीने नोकरी द्यावी.
  • संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत सखोल चौकशी करावी.
  • मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
  • थकीत वेतन वारसांना एकरकमी अदा करावे.

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे.

यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू खेडकर, इंजि. रामकृष्ण मोरे, जयंतीलाल खेडकर, अॅड. प्रकाश भोई, अशोक शिवदे, विवेक खेडकर, तुकाराम लांबोळे, आर.डी. मोरे, महेंद्र साठे, डॉ. गणेश ढोले, सुरेश वाडीले यांच्यासह समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

सामाजिक समता पर्वानिमित्त युवकमित्र संस्थेतर्फे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Next Post

शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात

Related Posts

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात
ताज्या घडामोडी

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026
4
ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?
ताज्या घडामोडी

ग्रामसभेच्या पूर्वसंमतीशिवाय प्रकल्पाला मंजुरी?

September 29, 2026
1
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल
ताज्या घडामोडी

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक : माजी आमदार राहुल जगताप यांचा पहिला अर्ज दाखल

September 29, 2026
4
सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड
ताज्या घडामोडी

सोगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शारदा सरडे यांची बिनविरोध निवड

September 29, 2026
19
ताज्या घडामोडी

संविधान सप्ताहानिमित्त दोडामार्ग येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

September 29, 2026
2
ताज्या घडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कोणाच्या निष्काळजीपणामुळे?

September 29, 2026
4
Next Post
शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात

शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात

ताज्या बातम्या

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

माहूर शहरातील रखडलेली महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी आमरण उपोषण

September 30, 2026

लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त अशोक सूर्यवंशी यांचा तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव!

September 30, 2026
बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

बोरिवली पूर्व येथे भटक्या-विमुक्तांसाठी शासकीय प्रमाणपत्रांचे शिबिर उत्साहात

September 29, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In