• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 16, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा शहरात वाढते अतिक्रमण आणि वाहतूक कोंडी; प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात
0
SHARES
14
VIEWS
Ad 1

उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांची मागणी

शहादा, दि. १५ (प्रतिनिधी)
शहादा शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमण, बेशिस्त वाहतूक आणि अनियंत्रित पार्किंगमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त आणि कठोर उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शहादा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. माधवी मकरंद पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. महात्मा फुले चौक ते श्रेयस हॉस्पिटल, स्टेट बँक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, चार रस्ता ते सोनार गल्ली तसेच महात्मा गांधी पुतळा ते बागवान गल्ली या भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली आहे.

RelatedPosts

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

वन-वे नियमांचे उल्लंघन करून वाहनचालक सर्रास राँग साईडने वाहने चालवत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याशिवाय मुख्य रस्त्यांवर अवजड वाहनांची बिनधास्त ये-जा सुरू असल्याने प्रशासनाचा धाक उरला नसल्याचे चित्र दिसत आहे.

विशेष म्हणजे, शहादा नगरपालिका कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढली आहेत. या परिसरात नॉनव्हेज विक्रीच्या गाड्या आणि अंडाकरी विक्रेत्यांनी रस्त्यालगत व्यवसाय थाटल्याने अस्वच्छता, दुर्गंधी आणि गर्दीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर फळ विक्रेते, थंड पेय विक्रेते आणि इतर फेरीवाल्यांनी रस्त्यावरच दुकाने उभारल्यामुळे पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. व्यवसाय करण्याचा अधिकार सर्वांना असला तरी सार्वजनिक रस्ते अडवून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे मत सौ. पाटील यांनी व्यक्त केले. प्रशासनाने अशा फेरीवाल्यांसाठी स्वतंत्र नियोजित जागा निश्चित करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी डायमंड कॉर्नर परिसरातील बॅरिकेटिंगचे नियोजन पुन्हा तपासावे तसेच दुचाकी वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. रस्त्याच्या एका बाजूस नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था सुरू करावी आणि पोलीस व नगरपालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अवैध पार्किंग तसेच राँग साईड वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

“अतिक्रमणमुक्त, शिस्तबद्ध आणि सुरक्षित शहादा ही काळाची गरज आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठे अपघात घडू शकतात,” असा इशाराही उपनगराध्यक्षा सौ. माधवी पाटील यांनी दिला आहे. या निवेदनाची प्रत पुढील कार्यवाहीसाठी शहादा पोलीस निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

उपोषणकर्ते माणिक निलेवाड यांच्या मृत्यूस कारणीभूत अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न

Related Posts

ताज्या घडामोडी

कृषी विद्यापीठातील चौकीदाराच्या तक्रारीवर चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल प्राप्त; सुरक्षा पर्यवेक्षकाचा कार्यभार बदलला

August 15, 2026
22
ताज्या घडामोडी

सोनगिरीचा रस्ता आठ वर्षांपासून रखडला; ग्रामस्थ त्रस्त

August 15, 2026
52
शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.
ताज्या घडामोडी

शहादा शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन; सर्वसमावेशक बैठक घेण्याचा निर्णय.

August 6, 2026
14
अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार; मानवतेचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखितघटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ धाव; जखमीला दिली वेळेवर मदत, नागरिकांकडून कौतुकाचा वर्षाव माहूर

7
वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:
ताज्या घडामोडी

वाहतूक समस्यांवर चर्चा नव्हे, तर प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या:

August 6, 2026
31
स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !
ताज्या घडामोडी

स्वतःचा दृष्टिकोन आपले वर्तन ठरवतो !

August 6, 2026
59
Next Post
शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न

शहाद्यात भाजपाचे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली येथे बहुजन युथ पॅंथर उत्तर मुंबई जिल्हा मार्फत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

कांदिवली पश्चिम येथील श्री सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था व्दारा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात पार पडला.

August 15, 2026
सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

सीआरपीएफ जवान रामदास मधुकर सवार यांचा प्रशस्तिपत्राने गौरव

August 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In