• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
August 20, 2026
in Blog
0
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

बदनापूर : प्रतिनिधी

पाणी फाउंडेशन व कृषी विभाग, बदनापूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागपंचमीचे औचित्य साधून कृषीपुत्र शेतकरी गट, बाजार वाहेगाव यांच्या वतीने जलसंधारणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. पावसाचा मोठा खंड, अनियमित पर्जन्यमान आणि आगामी काळातील पाणीटंचाईचे आव्हान लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी म्हणून गटातील शेतकऱ्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा उभारला.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

या बंधाऱ्याची लांबी सुमारे ३० फूट, रुंदी ६ फूट आणि उंची ७ फूट असून, त्यासाठी दोन्ही बाजूंना सुमारे १३० गोणी रेतीने भरून रचण्यात आल्या. मध्यभागी सुमारे ३ फूट रुंदीची माती टाकून बंधारा तयार करण्यात आला. बंधाऱ्याच्या पाठीमागील भागात खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडवून साठवता येणार आहे.

या जलसंधारणामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होऊन शेतीसाठी उपलब्ध पाणीसाठा वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकरी गटाचा उत्साह पाहून पाणी फाउंडेशनचे किशोर इंगळे सर तसेच F4Fचे तांबिले सर यांनीही वनराई बंधारा उभारणीसाठी सहकार्य केले. तसेच प्रगतशील शेतकरी व मास्टर ट्रेनर बळीराम काळे यांनी गटातील शेतकऱ्यांकडून विविध कृषीपूरक उपक्रम राबवून घेतले. यामध्ये दशपर्णी अर्काची फवारणी, जीवामृत फवारणी, चिकट सापळे आणि पक्षी थांबे बसविण्याचा समावेश आहे.

वनराई बंधारा उभारणीसाठी बळीराम काळे, जयराम लाखे, राजूभाऊ काळे, जयराम काळे, अमोल काळे, अनिल आरसूड, बाबासाहेब दिवटे, अशोक कवळे, मोहन तिवारी, ज्ञानेश्वर लहाने आणि माजी सरपंच अरुण काका काळे यांच्यासह शेतकरी बांधवांनी योगदान दिले.

शेतकऱ्यांनी श्रमदानातून उभारलेल्या या बंधाऱ्यामुळे जलसंधारणासोबतच सामूहिक प्रयत्न, सामाजिक बांधिलकी आणि शाश्वत शेतीचा आदर्श निर्माण झाला आहे.

Previous Post

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

Next Post

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
200
Next Post
धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In