• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 17, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहादा येथे भाजपची दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

शहादा | दि. १७ | प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी, नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान अंतर्गत शहादा येथे दि. १६ व १७ मे रोजी दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली.

RelatedPosts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा विशेष महत्त्वाची ठरली.

कार्यशाळेचे उद्घाटन भाजपचे नंदुरबार जिल्हा प्रभारी बबनराव चौधरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी भारतमाता, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी होते.

या निवासी प्रशिक्षण शिबिराला आमदार राजेश पाडवी, माजी खासदार डॉ. हिनाताई गावित, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, प्रा. पंकज पाठक, शहादा नगरपालिका उपनगराध्यक्षा सौ. माधवीताई मकरंद पाटील, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, कैलास चौधरी, डॉ. सत्यानंद गावित, जिल्हा उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्यासह जिल्ह्यातील विविध आघाड्यांचे प्रमुख, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेत पक्षाचा इतिहास, संघटनात्मक कौशल्य, सध्याची राजकीय परिस्थिती, केंद्र व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर यांसारख्या विविध विषयांवर तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारसरणीवर आधारित पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हा या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

शहादा शहरातील व्हीएसएस लॉन्स येथे आयोजित या निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी शहर व तालुका भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: Netradipak Kuwar
Previous Post

कन्नड शहरात अत्याधुनिक ‘सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पा’चे उद्घाटन; गुन्हेगारीवर ठेवली जाणार करडी नजर

Next Post

सेलू शहरात महागाईचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले

Related Posts

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
1
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण
ताज्या घडामोडी

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026
1
मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन
ताज्या घडामोडी

मुरुडमध्ये पीक कापणी प्रयोग; अर्ध्या गुंठ्यात केवळ २१४ ग्रॅम सोयाबीन

October 3, 2026
1
ताज्या घडामोडी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेळ्या दगावल्या; २३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाई रखडली

October 3, 2026
5
अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद
ताज्या घडामोडी

अकोल्यात ३ ऑक्टोबरला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साधणार संवाद

October 3, 2026
1
कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी
ताज्या घडामोडी

कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी

October 2, 2026
18
Next Post
सेलू शहरात महागाईचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले

सेलू शहरात महागाईचा पुन्हा भडका; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In