• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कृषी विभागामार्फत इंझाळा येथे ‘पोक्रा’ अंतर्गत मृदा व जलसंधारणावर पथदर्शी सादरीकरण; जलदिंडीतून पाण्याचे महत्त्व पटविले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
कृषी विभागामार्फत इंझाळा येथे ‘पोक्रा’ अंतर्गत मृदा व जलसंधारणावर पथदर्शी सादरीकरण; जलदिंडीतून पाण्याचे महत्त्व पटविले
0
SHARES
62
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | देवळी |

इंझाळा, ता. देवळी, जि. वर्धा | दि. १४ मे २०२६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोक्रा) अंतर्गत मौजा इंझाळा येथे मृदा व जलसंधारण (NRM) कामांचे पथदर्शी सादरीकरण आणि शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

कार्यक्रमाची सुरुवात जलदिंडीने करण्यात आली. “पाणी अडवा, पाणी जिरवा” हा संदेश देत शेतकरी बांधवांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. जलदिंडीमुळे गावात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी मंडळ कृषी अधिकारी पुलगाव येथील श्री. रितेश करोडे यांनी अल निनोचा हवामानावर होणारा परिणाम तसेच आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. उप कृषी अधिकारी पुलगाव श्री. डी. एस. राठोड यांनी बीबीएफ (रुंद सरी-वरंबा) लागवड तंत्रज्ञानाचे फायदे आणि त्याचे महत्त्व स्पष्ट केले.

एनआरएम कॉर्डिनेटर श्री. प्रशांत काटकर यांनी जलतारा, शोषखड्डे आणि मृदसंधारणाच्या विविध कामांची प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. पावसाचे पाणी शेतातच मुरवून भूजल पातळी वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात अपूर्वा काटरपवार यांनी जलसंवर्धनावर आधारित भारूड सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच शेतकरी बंधू-भगिनींनी भजन आणि पथनाट्याच्या माध्यमातून जलसंधारणाचा प्रभावी संदेश दिला.

या कार्यक्रमाला समूह सहाय्यक कु. राधिका अडसोड, भारती सावरकर, अश्विनी डहाके, वनिता उईके, तसेच ढाक मॅडम, कृषी ताई शीतल भानखेडे, सुनीता लाकडे आणि बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना खैरकार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. कैलास मसराम यांनी मानले. कार्यक्रमाला इंझाळा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Gaurav Mature
Previous Post

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला दर्यापूर तहसीलचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश

Next Post

चोंढी गावात निंबोळी व दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
2
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
15
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
62
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
चोंढी गावात निंबोळी व दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक

चोंढी गावात निंबोळी व दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In