• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चोंढी गावात निंबोळी व दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in ताज्या घडामोडी
0
चोंढी गावात निंबोळी व दशपर्णी अर्काचे प्रात्यक्षिक
0
SHARES
54
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी | देवळी |

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान मोहिमेअंतर्गत मौजा चोंढी येथे दि. १५ मे २०२६ रोजी निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

या कार्यक्रमात संजीवनी गटातील महिला व पुरुष शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम तसेच नैसर्गिक उपाययोजनांद्वारे पीक संरक्षण करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क यांच्या वापरामुळे पिकांवरील किडींचे प्रभावी नियंत्रण करता येते, उत्पादन खर्चात बचत होते तसेच जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी सहायक कृषी अधिकारी वंदना खैरकार यांनी सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर देत मार्गदर्शन केले. समूह सहाय्यक राधिका अडसोड आणि कृषी ताई सारिका थूल यांनी संजीवनी गटाच्या सदस्यांना एकत्र करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले.

कडुनिंब, सीताफळ, करंज, निर्गुडी, पपई, रुई, घाणेरी, टणटणी, एरंड आणि गुळवेल या दहा वनस्पतींच्या पानांपासून दशपर्णी अर्क तयार करून दाखविण्यात आला.

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय आणि हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले.

Tags: Gaurav Mature
Previous Post

कृषी विभागामार्फत इंझाळा येथे ‘पोक्रा’ अंतर्गत मृदा व जलसंधारणावर पथदर्शी सादरीकरण; जलदिंडीतून पाण्याचे महत्त्व पटविले

Next Post

शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत घवघवीत यश; ९५.१२ टक्के निकाल

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
0
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
3
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
5
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
61
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत घवघवीत यश; ९५.१२ टक्के निकाल

शिवाजी माध्यमिक विद्यालयाचा एसएससी परीक्षेत घवघवीत यश; ९५.१२ टक्के निकाल

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In