• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर हिंदवी जनक्रांती सेनेचे आंदोलन; शेतकरी प्रश्नांवर तीव्र भूमिका

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर हिंदवी जनक्रांती सेनेचे आंदोलन; शेतकरी प्रश्नांवर तीव्र भूमिका
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

वैजापूर | प्रतिनिधी

आज सोमवार दि. १८ मे रोजी वैजापूर पंचायत समिती कार्यालयासमोर हिंदवी जनक्रांती सेनेच्या वतीने प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशांची प्रत जाळून निदर्शने करण्यात आली. हिंदवी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय पाटील साळुंके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

यावेळी अजय पाटील साळुंके यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, “शेतकरी आणि कष्टकरी वर्गाचे प्रश्न तातडीने मार्गी लावले नाहीत, तर लोकप्रतिनिधींच्या कार्यालयांवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच गावबंदीचा निर्णय घेतला जाईल.”

आंदोलनात शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर साळुंके, प्रकाश बापू ठुबे, गणेश तांबे, बाळासाहेब जानराव, संतोष गोरे, मनोज नळे, आकाश गोरे, दिपक साहानखोरे, किशोर मगर, दादाभाऊ तांबे, अर्चना साळुंके आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी व कष्टकरी सहभागी झाले होते.

प्रशासनाच्या वतीने सहाय्यक गटविकास अधिकारी जायभाये, आरेलेख मगर तसेच प्रशासकांच्या वतीने सभापती पती आणि उपसभापती पती बाळा पाटील जाधव यांनी आंदोलकांना लेखी आश्वासन दिले.

आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

  • मनरेगा योजनेतील मंजूर विहिरी, शेततळे, गायगोठे, वृक्ष लागवड आदी कामांची कुशल रक्कम तात्काळ लाभार्थींना द्यावी.
  • शिऊर गटातील योजनांची चौकशी करताना विकासकामे ठप्प होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत नवीन विहिरी, शेततळे, रस्ते आणि वृक्ष लागवड कामांना तातडीने मंजुरी द्यावी.
  • मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेअंतर्गत शेतरस्ते मंजूर करावेत.
  • ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक ऑनलाइन हजेरी यंत्रणा सुरू करावी.
  • अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठका कमी घेऊन नागरिकांची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.
  • ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपलेल्या ठिकाणी प्रशासक नेमून लाभार्थ्यांना थकीत रक्कम द्यावी.
  • सर्व शासकीय अधिकारी व पगारी लोकप्रतिनिधींना कायमस्वरूपी अधिकृत मोबाईल क्रमांक देण्यात यावेत.
  • कांदा निर्यात सुरू करून कांद्याला प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान द्यावे.

या आंदोलनामुळे वैजापूर तालुक्यात शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले असून प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे – सिंदखेड गावातील महिलांची दैना

Next Post

“लंगोटी महादेव” मंदिराचा होणार कायाकल्प

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
42
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
13
Next Post

“लंगोटी महादेव” मंदिराचा होणार कायाकल्प

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In