• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

हातोडा पुलाजवळ भीषण अपघात; नवविवाहित युवकासह वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 18, 2026
in Blog
0
हातोडा पुलाजवळ भीषण अपघात; नवविवाहित युवकासह वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

तळोदा प्रतिनिधी

तळोदा-नंदुरबार मार्गावरील हातोडा पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात नवविवाहित युवकासह पाच वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून नवविवाहिता गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

RelatedPosts

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एमएच ०४ जीजे ०९३० क्रमांकाची स्विफ्ट कार आणि एमएच ३९ एआर ६०४३ क्रमांकाच्या पल्सर दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात नंदुरबार तालुक्यातील बलवंड येथील रहिवासी जयपालसिंग भारतसिंग गिरासे (वय २६) यांचा जागीच मृत्यू झाला.

जयपालसिंग गिरासे यांचे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच मोठ्या उत्साहात लग्न झाले होते. अंकलेश्वर येथे नोकरी करणारे जयपाल हे शांत, होतकरू आणि कुटुंबवत्सल युवक म्हणून परिचित होते. खान्देशातील पारंपरिक ‘आमरस-पूरणपोळी’ निमंत्रणासाठी जयपाल आणि त्यांची पत्नी निकिता गिरासे हे प्रतापपूर येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यांच्यासोबत दोंडाईचा येथील साडूचा पाच वर्षीय मुलगा निरजकुमार कल्याणसिंग गिरासे हाही होता. विशेष म्हणजे त्या दिवशीच त्याचा वाढदिवस होता.

पाहुणचार आटोपून बलवंडकडे परतत असताना हातोडा पूल ओलांडल्यानंतर पुढील वळणावर समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात जयपालसिंग गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी निकिता गिरासे गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, उपचारादरम्यान पाच वर्षीय निरजकुमार कल्याणसिंग गिरासे याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या दिवशी घरात वाढदिवसाचा आनंद साजरा होणार होता, त्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र व गुजरात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेला संसार आणि वाढदिवशीच काळाच्या पडद्याआड गेलेले निष्पाप बालपण या दुर्दैवी घटनेमुळे गिरासे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Previous Post

वादळी वाऱ्याचा फटका; ९ पैकी २ सोलर पाट्या फुटल्या, शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान

Next Post

ओम मुळे यांच्याकडे सावरगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार

Related Posts

Blog

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
20
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड
Blog

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
44
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड
Blog

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026
1
दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार
Blog

दिलीप पाटील व अवधूत पाटील यांचा जाहीर सत्कार

October 1, 2026
15
बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन
Blog

बाभुळगाव खुर्दचा बंद वहिवाट रस्ता मोकळा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

October 1, 2026
47
Blog

शहाद्यात ९ ऑक्टोबरला मोफत पोटविकार निदान शिबिर

October 1, 2026
14
Next Post

ओम मुळे यांच्याकडे सावरगांव केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभार

ताज्या बातम्या

सोहम अहिरे यांची वंचित बहुजन युवा आघाडीच्या युवा संपर्क प्रमुखपदी निवड

October 1, 2026
वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

वणीमध्ये पहाटे सहा वाजता तपासणी पथकाची धाड

October 1, 2026
प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

प्रा. मल्लिकार्जून शिंत्रे यांची ‘राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’साठी निवड

October 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In