• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी, ता. प्र. दि. १९ :
वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक येत्या १८ जून २०२६ रोजी पार पडणार असून, तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण ९७७ सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १८ मेपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, सर्व संबंधितांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजीव देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार उपस्थित होते.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

जिल्हानिहाय मतदारसंख्या

या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ४६९ सदस्य मतदान करणार आहेत. यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेचे ६६ सदस्य तसेच जिल्ह्यातील १० नगर परिषद आणि ७ नगर पंचायतींच्या सदस्यांचा समावेश आहे.
वर्धा जिल्ह्यातील १० नगर परिषदांमधील २६४ सदस्य मतदार असतील, तर गडचिरोली जिल्ह्यातील ३ नगर परिषद आणि ९ नगर पंचायतींतील २४४ सदस्य मतदान करणार आहेत. तिन्ही जिल्ह्यांतील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या सध्या शून्य असल्याची माहिती देण्यात आली.

१७ मतदान केंद्रांची व्यवस्था

निवडणुकीसाठी तिन्ही जिल्ह्यांतील प्रत्येक उपविभागीय मुख्यालयात मतदान केंद्र उभारण्यात येणार असून, एकूण १७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या निवडणुकीची मतमोजणी चंद्रपूर जिल्हा स्तरावर होणार आहे.

केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले.

Previous Post

सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Next Post

स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
50
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
19
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन

स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In