• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in ताज्या घडामोडी
0
सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याविरोधात गडचिरोलीत हजारो शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
0
SHARES
6
VIEWS
Ad 1

ब्रम्हपुरी | ता. १८ मे २०२६

गडचिरोली जिल्ह्यातील विमानतळ, एमआयडीसी आणि इतर विविध प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या विरोधात जिल्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होत असतानाही शासन विविध प्रकल्पांसाठी जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया राबवत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. प्रस्तावित विमानतळासाठी गडचिरोली तालुक्यातील गुरुवाडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही बळजबरीने प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींना स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन कुणाच्याही शेतजमिनी एमआयडीसीसाठी घेतल्या जाणार नाहीत, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“माती ही आमची माय असून तिच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार,” असा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.

तर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार न केल्यास ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.

या आंदोलनात विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी, महिला भगिनी, युवक, काँग्रेस कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

आगामी जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; ब्रम्हपुरी काँग्रेस ओबीसी सेलचे निवेदन

Next Post

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
46
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
18
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान; ९७७ मतदार बजावणार हक्क

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In