• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
कांद्याला किमान ३ हजार रुपये हमीभाव द्या; कृ.ऊ.बा. समिती उपसभापती हरि आण्णा जाधव यांची मागणी
0
SHARES
77
VIEWS
Ad 1

प्रतिनिधी :

सध्या बाजारात कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ६०० ते ७०० रुपये इतकाच दर मिळत असल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र लाल कांद्यानंतर आता उन्हाळी कांद्यालाही अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे.

RelatedPosts

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

केंद्र शासनाने कांदा खरेदीसाठी प्रतिक्विंटल १२३५ रुपये दर जाहीर केला असला तरी तो अत्यल्प असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे कांद्याला हमीभाव, निर्यातवाढ आणि आर्थिक अनुदानाची मागणी जोर धरू लागली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन ग्राहक शोधून कांदा निर्यात वाढवावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, वीज, इंधन आणि मजुरीचे वाढते दर यामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दुसरीकडे बाजारभाव घटल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक ताळमेळ पूर्णपणे बिघडला आहे.

भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे साठवलेला कांदा खराब होऊ लागल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे कांद्याला प्रतिक्विंटल किमान ३ हजार रुपये हमीभाव जाहीर करावा तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण आखावे, अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हरि आण्णा जाधव यांनी शासनाकडे केली आहे.

Previous Post

स्पर्धा परीक्षा, आरक्षण, नीट घोटाळा व मतदार नोंदणी प्रश्नांवर काँग्रेसचे निवेदन

Next Post

प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

Related Posts

Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
3
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
11
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश
Blog

तु. बा. कदम महाविद्यालयाच्या पूजा भोसलेचे जिल्हास्तरीय हिंदी निबंध स्पर्धेत घवघवीत यश

October 4, 2026
4
पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध
Blog

पश्चिम वाहिनी नद्यांवरील धरणांना शेतकऱ्यांचा एकमुखी विरोध

October 4, 2026
3
Blog

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026
1
Next Post
प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयात बालसंस्कार शिबिरास उत्साहात प्रारंभ

ताज्या बातम्या

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In