• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

जालना, दि. १९ :
जालना जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा साठा तात्पुरता उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वाहनधारक आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरून घेत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच इंधनाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RelatedPosts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना

प्रशासनाने संबंधित तेल कंपन्या आणि पेट्रोल पंप चालकांशी समन्वय साधून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा नियमित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस प्रशासनाच्या मदतीने नियोजन करण्यात येणार आहे.

स्थानिक वृत्तपत्रे, सोशल मिडिया आणि इतर माध्यमांद्वारे अधिकृत व सत्य माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येत असून, कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा घबराट निर्माण करणारे संदेश पसरवू नयेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

जिल्ह्यातील सर्व पेट्रोल आणि डिझेल पंपांवर तात्काळ तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेद्वारे इंधन साठा, विक्री आणि वितरणाची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

कोणत्याही पेट्रोल पंप चालकाकडून जाणीवपूर्वक साठेबाजी, कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने विक्री करणे अथवा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच इतर लागू कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

याशिवाय दररोज बंद आणि सुरू असलेल्या पेट्रोल पंपांचा अहवाल, उपलब्ध इंधन साठ्याची माहिती आणि करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी शांतता राखून आवश्यकतेपुरतेच इंधन खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुकेशिनी पगारे यांनी केले आहे.

Previous Post

अधिक मासानिमित्त श्रीमद् देवी भागवत कथेचे आयोजन

Next Post

दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Related Posts

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
2
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
25
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
4
Blog

नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण

October 3, 2026
7
Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
Next Post
दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताज्या बातम्या

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In