• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी :
दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर सध्या डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत असून, अनेक ठिकाणी झुंबड उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युद्धसदृश परिस्थिती आणि इंधनटंचाईच्या अफवांमुळे पुढील काळात पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, या भीतीने नागरिक मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याकडे वळले आहेत.

शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर नागरिक मोठमोठ्या ड्रममध्ये डिझेल भरून साठवणूक करताना दिसत आहेत. वाहनांसाठी इंधन मिळावे म्हणून नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या असून, ट्रक, ट्रॅक्टर, टेम्पो आणि इतर मोठी वाहनेही मोठ्या प्रमाणात पंपांवर दाखल होत आहेत. त्यामुळे आधीपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

वाढत्या गर्दीत वादावादी

दि. १८ रोजी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास स्टेशन भागातील जिनवाला पेट्रोल पंपावर वाढत्या गर्दीमुळे नागरिकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याची माहिती समोर आली आहे. काहीवेळा परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली की नागरिक एकमेकांवर धावून जात असल्याचेही पाहायला मिळाले. या प्रकारामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिस बंदोबस्ताची मागणी

शहरातील परिस्थिती लक्षात घेता प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा किंवा किमान एका पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणात राहून संभाव्य भांडणे आणि अनुचित प्रकार टाळता येतील, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, आमच्या प्रतिनिधींनी शहरातील विविध पेट्रोल पंपांना भेट दिली असता काही ठिकाणी डिझेल-पेट्रोलचा साठा संपल्याने पंप बंद असल्याचे दिसून आले, तर काही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

आता शहरातील पेट्रोल-डिझेलसाठी सुरू असलेली ही तारांबळ प्रशासनाच्या उपाययोजनांमुळे थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

जालना जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next Post

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; ३ महिन्यांपूर्वीचा सिमेंट रस्ता गटार पाईपसाठी पुन्हा खोदला

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
4
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
17
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; ३ महिन्यांपूर्वीचा सिमेंट रस्ता गटार पाईपसाठी पुन्हा खोदला

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In