• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; ३ महिन्यांपूर्वीचा सिमेंट रस्ता गटार पाईपसाठी पुन्हा खोदला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
0
SHARES
31
VIEWS
Ad 1

ठाणे | उल्हासनगर प्रतिनिधी :
उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा धक्कादायक प्रकार कॅम्प क्रमांक-४ मधील दहा चाळ परिसरात समोर आला आहे. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी बांधलेला सिमेंट काँक्रिटचा रस्ता आता भुयारी गटाराचे पाईप टाकण्यासाठी पुन्हा खोदण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कॅम्प नं-४, दहा चाळ परिसरात काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांना चिखल, खड्डे आणि खराब रस्त्यांपासून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रस्त्याखालून भुयारी गटाराचे पाईप टाकण्याचे काम आधी न केल्याने आता प्रशासनाला अचानक जाग आली असून अवघ्या ९० दिवसांत नव्याने तयार केलेला रस्ता मशीनच्या साहाय्याने उखडण्यात आला आहे.

RelatedPosts

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

नियोजनाच्या अभावामुळे निधी वाया

सध्या शहरात ४५० कोटी रुपयांच्या भुयारी गटार योजनेसह एमएमआरडीए, शासन आणि विविध लोकप्रतिनिधींच्या निधीतून मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. मात्र, विभागांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असून “एक हात काय करतोय हे दुसऱ्या हाताला माहीत नाही” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

रस्ता खोदल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांना गाड्या मुख्य रस्त्यावर उभ्या कराव्या लागत असून, खोदलेल्या ढिगाऱ्यांमुळे वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना चालणेही कठीण झाले आहे.

नागरिकांचा संताप

शहरात आधीच अनेक ठिकाणी रस्ते खोदून दुरुस्तीची प्रतीक्षा सुरू असताना, नव्याने बांधलेल्या रस्त्यांची अशी अवस्था पाहून नागरिक संतप्त झाले आहेत. महापालिकेचा हा कारभार म्हणजे नियोजनाचा अभाव की टक्केवारीचे राजकारण, असा सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

दोषींवर कारवाईची मागणी

“हा जनतेच्या कष्टाच्या पैशाचा सरळ अपव्यय आहे. रस्ता बांधताना प्रशासनाला गटार योजनेची आठवण झाली नाही का? महासभेत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला जाईल आणि दोषींवर कारवाईची मागणी करण्यात येईल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक विकास खरात यांनी दिली आहे.

Previous Post

दोंडाईचा शहरातील पेट्रोल पंपांवर डिझेल-पेट्रोलसाठी झुंबड; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next Post

निलेश कापकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; अंध कीर्तनकार आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

Related Posts

Blog

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026
8
शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर
Blog

शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी लहुजी शितोळे; महिला संघाच्या अध्यक्षपदी आरती दरेकर

October 3, 2026
1
जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी
Blog

जालन्याचे राजू काणे एमसीएच्या टुर्नामेंट कमिटीच्या चेअरमनपदी

October 3, 2026
1
मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
Blog

मलका गुडा येथे ग्रामस्वच्छता मोहिमेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

October 3, 2026
19
२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद
Blog

२२ सप्टेंबरचा जाचक जीआर रद्द करा; अन्यथा १ ऑक्टोबरपासून बेमुदत काम बंद

October 3, 2026
1
Blog

कायगावच्या झोपडपट्टीत दोन दिवसांपासून अंधार!

October 3, 2026
2
Next Post
निलेश कापकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; अंध कीर्तनकार आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

निलेश कापकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; अंध कीर्तनकार आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

ताज्या बातम्या

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

सिसा येथे शेतजमीन नावावर करण्याच्या गैरसमजातून दोघांना मारहाण

October 3, 2026

सामान्य कार्यकर्त्यापासून विधानसभेपर्यंतचा प्रवास; ‘माऊली आबा’ या नावामागची लोकसंपर्काची कहाणी

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In