• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निलेश कापकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; अंध कीर्तनकार आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 20, 2026
in Blog
0
निलेश कापकर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी; अंध कीर्तनकार आणि कॅन्सरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
0
SHARES
251
VIEWS
Ad 1

सोनुना/नवेगाव :
गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांनी पुन्हा एकदा आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आहे. सोनुना येथील एका अंध कीर्तनकार महाराजांच्या मुलीच्या विवाहासाठी तसेच नवेगाव येथील कॅन्सरग्रस्त कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदतीचा हात दिला आहे.

अंध कीर्तनकाराच्या मुलीच्या विवाहासाठी १० हजारांची मदत

सोनुना येथील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले कीर्तनकार धनराज महाराज उत्तम गिऱ्हे यांच्या मुलीचा विवाह निश्चित झाला आहे. मात्र, घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने महाराजांच्या भक्तांनी सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्याकडे मदतीची विनंती केली होती.

RelatedPosts

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

या विनंतीला प्रतिसाद देत आणि महाराजांबद्दल असलेल्या आदरापोटी निलेश कापकर यांनी तात्काळ १० हजार रुपयांची रोख मदत सुपूर्द केली. या मदतीमुळे महाराज आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत कापकर यांचे आभार मानले.

कॅन्सरग्रस्त ससाणे कुटुंबालाही मदतीचा हात

नवेगाव येथील गजानन मोतीराम ससाणे यांच्या पत्नी गेल्या सात महिन्यांपासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू असून आतापर्यंत लाखो रुपयांचा खर्च झाला आहे. पुढील उपचारासाठी आणखी मोठ्या आर्थिक मदतीची गरज असल्याचे समोर आले आहे.

या परिस्थितीची माहिती मिळताच निलेश कापकर यांनी थेट ससाणे कुटुंबाच्या घरी भेट देत त्यांना धीर दिला. त्यांनी वैयक्तिक स्वरूपात ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच प्रवासादरम्यान ससाणे यांचा मोबाईल चोरीला गेल्याचे समजताच स्वतःजवळील मोबाईल फोनही त्यांना भेट दिला.

मुंबईत वैद्यकीय मदतीचे आश्वासन

याशिवाय शिवसेना (शिंदे गट) तसेच रुग्णसेवक मंगेश केणेकर यांच्याशी संपर्क साधून मुंबईत उपचारासाठी शासकीय आणि वैद्यकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासनही निलेश कापकर यांनी दिले आहे.

तसेच आदिवासी आणि ग्रामीण भागातील या गरजू ससाणे कुटुंबाला मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Previous Post

उल्हासनगर महापालिकेचा अजब कारभार; ३ महिन्यांपूर्वीचा सिमेंट रस्ता गटार पाईपसाठी पुन्हा खोदला

Next Post

अकोल्यातील वाढत्या उष्णतेवर प्रशासन गप्प का? नागरिकांचा संतप्त सवाल

Related Posts

Blog

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
0
Blog

इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव उपकेंद्राला पहिले NQAS मानांकन; ८९.९४ टक्के गुणांसह मानाचा तुरा

October 3, 2026
4
Blog

अष्टविनायक नवरात्र उत्सव मंडळाची जय्यत तयारी; युवा शक्तीवर सोपविली उत्सवाची जबाबदारी

October 3, 2026
17
साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी
Blog

साई विद्यालय वंधली येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी

October 3, 2026
18
खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
Blog

खेडमध्ये कुणबी समाजोन्नती संघाचा १०६ वा वर्धापन दिन उत्साहात; विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

October 3, 2026
96
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी
Blog

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची दगडवाडी येथे दुष्काळी पाहणी

October 3, 2026
8
Next Post

अकोल्यातील वाढत्या उष्णतेवर प्रशासन गप्प का? नागरिकांचा संतप्त सवाल

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In