• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे “आधुनिक मधमाशी पालन” विषयावर प्रशिक्षण संपन्न
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

धुळे : जागतिक मधुमक्षिका दिनानिमित्त कृषी विज्ञान केंद्र, धुळे येथे लुपिन फाउंडेशन आणि एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विस्तार कार्यकर्ते व शेतकऱ्यांसाठी “आधुनिक मधमाशी पालन” या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय, धुळे येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी कार्यक्रम समन्वयक श्री. रोहित कडू, प्रशिक्षण समन्वयक व शास्त्रज्ञ डॉ. पंकज पाटील, शास्त्रज्ञ सौ. अमृता राऊत, श्री. जगदीश काथेपुरी, डॉ. धनराज चौधरी, डॉ. आतिश पाटील, लुपिन फाउंडेशनचे श्री. गौरव पाटील, श्री. रवी देशमुख तसेच एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनचे श्री. गोकुळ खलाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बबनराव इल्हे यांनी शेती उत्पादन वाढीसाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी मधमाशांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भारत सरकारच्या संतुलित खत वापर अभियानाबाबत श्री. रोहित कडू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंकज पाटील यांनी केले. त्यांनी आधुनिक मधमाशी पालन, मित्र किडींचे संवर्धन तसेच मध उत्पादन तंत्रज्ञान याविषयी सविस्तर माहिती दिली. नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये शेतीपूरक निविष्ठांचा वापर याविषयी डॉ. आतिश पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर मधाचे पोषणमूल्य, त्याचे आरोग्यदायी फायदे आणि विविध प्रक्रिया उत्पादने याबाबत सौ. अमृता राऊत यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. गोकुळ खलाणे यांनी मानले.

या प्रशिक्षण कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शेतकरी आणि विस्तार कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुणाल राजळे, जीवन राणे, रमेश शिंदे तसेच मधुसूदन अहिरे यांनी विशेष सहकार्य केले.

Previous Post

पत्रकारावर हल्ल्याप्रकरणी पत्रकार संघटनांचे निवेदन; दोषींवर कारवाईची मागणी

Next Post

शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
5
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
14
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
19
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
64
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण

शेलगाव देशमुख येथे महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In