• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

किनवट-इस्लापूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर गडकरींचा दणका; कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
किनवट-इस्लापूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर गडकरींचा दणका; कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश
0
SHARES
60
VIEWS
Ad 1

किनवट प्रतिनिधी :

किनवट-कोठारी (चि.) ते इस्लापूर या राष्ट्रीय महामार्ग १६१ एच्या कामातील प्रचंड अनियमितता आणि निकृष्ट दर्जा अखेर चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक नागरिकांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांची भेट घेऊन सविस्तर पुराव्यांसह निवेदन सादर केले.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

आमदार केराम यांनी मांडलेली वस्तुस्थिती पाहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या मुख्य अभियंत्यांना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. प्रधानसांगवीजवळील टोलनाक्याजवळ सुरू असलेले काम त्वरित थांबवण्याचे निर्देश देण्यात आले असून, निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित एजन्सी व कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तसेच उर्वरित कामांसाठी तातडीने नवीन निविदा काढून दर्जेदार व जलदगतीने काम पूर्ण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

आमदार भीमराव केराम यांनी पुराव्यांसह कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराचा पाढा वाचत महामार्गाच्या कामातील अनेक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याला ठिकठिकाणी मोठ्या भेगा पडल्याचे त्यांनी सांगितले. निकृष्ट दर्जा आणि खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

याशिवाय साईड पट्ट्यांमध्ये योग्य प्रमाणात मुरूम न टाकणे, करारातील वेळेचे व गुणवत्तेचे निकष पाळले न जाणे, तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आता नव्या निविदेनंतर महामार्गाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदार भीमराव केराम यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या इतर कंत्राटदारांचेही धाबे दणाणले असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

Previous Post

नागापूरचे माजी सरपंच प्रभूआप्पा तोंडारे यांचे निधन; परिसरात हळहळ

Next Post

ज्येष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांना राज्यस्तरीय “पत्रकार रत्न” पुरस्कार जाहीर

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
3
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
11
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
15
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
6
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
14
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
ज्येष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांना राज्यस्तरीय “पत्रकार रत्न” पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांना राज्यस्तरीय “पत्रकार रत्न” पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In