• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पनवेल तहसील कार्यालयात ACB चा दणका! मंडळ अधिकारी गोवर्धन माने लाच घेताना ताब्यात; चौकशीची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
पनवेल तहसील कार्यालयात ACB चा दणका! मंडळ अधिकारी गोवर्धन माने लाच घेताना ताब्यात; चौकशीची मागणी
0
SHARES
35
VIEWS
Ad 1

पनवेल:पनवेल तहसील कार्यालयातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी तहसील कार्यालयाच्या परिसरात सापळा रचून मंडळ अधिकारी गोवर्धन माने याला लाचेची तीस हजार रुपये रक्कम स्वीकारताना पनवेल तक्का येथील मिठास स्वीट समोर रंगेहात ताब्यात घेतले. गावदेवीपाडा येथील उताऱ्यावर नाव नोंदीसाठी रकमेची मागणी करण्यात आली होती.या कारवाईमुळे शासकीय कार्यालयातील दलाली आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

या कारवाईनंतर पनवेलमधील नागरिकांमधून आणि राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कनिष्ठ कर्मचारी किंवा मंडळ अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाच घेण्याचे धाडस करू शकत नाहीत, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.त्यामुळे “मंडळ अधिकारी गोवर्धन माने हा नक्की कोणासाठी पैसे गोळा करत होता?” हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. गोवर्धन माने हा केवळ एक ‘कलेक्टर’ (पैसे गोळा करणारा दुवा) असून या लाचेच्या पैशांमधील हिस्सा वरिष्ठ तहसीलदारांना की अन्य कोणत्या बड्या अधिकाऱ्याला जाणार होता, याची निष्पक्ष आणि सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

पनवेल तहसील कार्यालयात यापूर्वीही लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना सातबारा, जमिनीच्या नोंदी आणि इतर दाखल्यांसाठी महिनोनमहिने चकरा माराव्या लागतात. कामे वेळेत करून घेण्यासाठी अशा प्रकारे लाचेची मागणी केली जाते.लाचलूचपत विभागाने आता केवळ माने याच्या अटकेवर न थांबता, या रॅकेटच्या मुळाशी जाऊन मागील सर्व व्यवहारांची आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सदर यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर रायगड-अलिबाग ‘एसीबी’च्या पोलीस उप अधीक्षक श्रीमती सरिता भोसले यांच्या नेतृत्वाखालील सापळा पथकातील सहाय्यक फौजदार विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील आणि पोलीस शिपाई नवदित नांदगांवकर यांनी ही कामगिरी बजावली.

Previous Post

ज्येष्ठ पत्रकार दत्ता भोंगळे यांना राज्यस्तरीय “पत्रकार रत्न” पुरस्कार जाहीर

Next Post

रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
50
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
19
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In