• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

पनवेल | प्रतिनिधी :

प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल यांच्या वतीने रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष तपासणी मोहिम सातत्याने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवून सुरक्षित वाहन चालवावे, असे आवाहन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी केले आहे.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

सन 2025-2026 तसेच एप्रिल 2026 या कालावधीत पनवेल आरटीओकडून विविध नियमभंग करणाऱ्या वाहनांवर व्यापक कारवाई करण्यात आली. या मोहिमेत विना हेल्मेट वाहन चालविणे, अवैध विमा, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने, अवैध प्रवासी वाहतूक, विना नंबर प्लेट वाहने, ऑटो रिक्षा नियमभंग, ओव्हरलोड वाहतूक, वैध परवाना नसलेली वाहने आदी प्रकारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.

गौण खनिज आणि ओव्हरलोड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही विशेष तपासणी करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांत अशा 235 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे 128.96 लाख रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे. क्षमतेपेक्षा अधिक माल वाहतूक, नंबर प्लेट नसणे, मालावर ताडपत्री नसणे, रिफ्लेक्टर नसणे यांसारख्या दोषांवर ही कारवाई करण्यात आली.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण 26 हजार 539 दोषी वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 105.19 लाख रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.

कारवाईतील प्रमुख गुन्हे पुढीलप्रमाणे —

  • विना हेल्मेट वाहन चालविणे : 11 हजार 243
  • अवैध विमा : 5 हजार 973
  • ओव्हरलोड मालवाहतूक : 2 हजार 349
  • ताडपत्री नसलेली वाहने : 304
  • विना नंबर प्लेट वाहने : 107
  • वैध फिटनेस प्रमाणपत्र नसलेली वाहने : 3 हजार 703
  • वाहन चालविताना मोबाईलचा वापर : 804
  • पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने : 6 हजार 705
  • वैध परवाना नसलेली वाहने : 2 हजार 816
  • वेगमर्यादा ओलांडणे : 6 हजार 379
  • ऑटो रिक्षा नियमभंग : 2 हजार 203
  • अवैध प्रवासी वाहतूक : 535
  • स्कूल बस नियमभंग : 229
  • ओडिसी वाहतूक करणारी वाहने : 219

रस्ता सुरक्षेसाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केले आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

पनवेल तहसील कार्यालयात ACB चा दणका! मंडळ अधिकारी गोवर्धन माने लाच घेताना ताब्यात; चौकशीची मागणी

Next Post

कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
47
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
57
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
18
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
8
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

ताज्या बातम्या

पर्यटनाचा आनंद शोकात बदलला; दिवेआगर समुद्रात आळंदीतील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

October 3, 2026

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In