• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in ताज्या घडामोडी
0
कुरुंदवाड पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ; विरोधकांचा सभात्याग
0
SHARES
47
VIEWS
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी :

कुरुंदवाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी आघाडीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर विरोधी नगरसेवकांनी सभात्याग करत पालिकेच्या प्रवेशद्वारात घोषणाबाजी केली. दरम्यान, सत्ताधारी आघाडीने विषय पत्रिकेवरील सर्व १० विषय बहुमताने मंजूर केले.

RelatedPosts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११.३० वाजता ही सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे होत्या. मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई व उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेच्या सुरुवातीलाच मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय चर्चेला आला. विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी इतिवृत्त सविस्तर वाचून दाखवण्याची मागणी केली. मात्र, सत्ताधारी नगरसेवकांनी मागील सभेत सर्व विषयांवर आधीच चर्चा झाल्याचे सांगत पुन्हा वाचनाची गरज नसल्याची भूमिका घेतली. यावरून दोन्ही गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि विरोधी नगरसेवकांनी निषेध नोंदवत सभात्याग केला.

सभात्यागानंतर विरोधी नगरसेवकांनी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारात घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप केला.

सभेत विषय पत्रिकेवरील सर्व १० विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये पालिकेच्या जुन्या मुख्य इमारतीच्या खराब झालेल्या कौलांच्या दुरुस्तीचा विषय विशेष महत्त्वाचा ठरला. ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ‘हेरिटेज लुक’ कायम ठेवून दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच चालू वर्षाच्या कर आकारणीबाबत नगरसेवक जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे आणि उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी भूमिका मांडली. कुरुंदवाड शहर पूरग्रस्त असल्याने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी शासकीय नियमांच्या अधीन राहून कमीत कमी कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय विकास आराखड्यातील गट क्रमांक १९८ मधील आरक्षण क्रमांक १९ अंतर्गत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेचा ताबा घेऊन पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्याचाही निर्णय सभेत घेण्यात आला.

बैठकीला उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, रमेश भुजूगडे (आण्णा), जवाहर पाटील, अक्षय आलासे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, दीपक परिट, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील, शुभम जोंग तसेच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयेशा बागवान, संगिता कर्नाळे, जयश्री पाटील, जुवेरिया गोलंदाज, रुक्साना बागवान, सुजाता जाधव उपस्थित होत्या.

“पालिकेचा कारभार पारदर्शक”

“नगरपालिकेचा कारभार पूर्णपणे कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकासकामे केली जात आहेत. विरोधकांनी अभ्यास करून बोलावे. सभागृहात कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही,” असे नगराध्यक्षा सौ. मनीषा डांगे यांनी सांगितले.

Tags: Darikant Kolekar
Previous Post

रस्ता सुरक्षेसाठी पनवेल आरटीओची विशेष तपासणी मोहीम; 26 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई

Next Post

कु. आकांक्षा वाघमारे हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

Related Posts

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
36
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
15
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
53
एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
खेळ

एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूलचे बॅडमिंटनमध्ये घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

October 3, 2026
16
साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा
ताज्या घडामोडी

साई विद्यालय वंधली येथे ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ उत्साहात; विद्यार्थिनी अक्षरा मरसकोल्हेचा वाढदिवसही साजरा

October 3, 2026
7
ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रुप ग्रामपंचायत भांग्रापाणी येथे ग्रामसभा उत्साहात संपन्न

October 3, 2026
30
Next Post
कु. आकांक्षा वाघमारे हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

कु. आकांक्षा वाघमारे हिचे दहावी परीक्षेत उज्ज्वल यश

ताज्या बातम्या

‘रोजगार मागणारे नव्हे, रोजगार देणारे बना’ — पिंटू पाटील निंबाळकर

October 3, 2026
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In