• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

राष्ट्रगीत आणि शिस्तीचा सन्मान

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 21, 2026
in Blog
0
राष्ट्रगीत आणि शिस्तीचा सन्मान
0
SHARES
64
VIEWS
Ad 1

अशोक बबन शेंडकर, मुख्याध्यापक – देवी एकवीरा विद्यालय, गोवंडी

देशाची खरी ओळख त्याच्या संविधानातून आणि शिस्तीतून निर्माण होत असते. भारताचे संविधान घडविण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेले अथक परिश्रम हे प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहेत. संविधानाने दिलेली मूल्ये, कर्तव्ये आणि शिस्त हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी ताकद आहे.

या शिस्तीचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे राष्ट्रगीताचा सन्मान. राष्ट्रगीत हे केवळ गाणे नसून, राष्ट्राभिमान, एकता आणि देशप्रेमाची भावना जागृत करणारा पवित्र स्वर आहे. कोणताही शासकीय कार्यक्रम असो, शाळेतील उपक्रम असोत किंवा चित्रपटगृहातील वातावरण — राष्ट्रगीत सुरू होताच प्रत्येकाने सावधान स्थितीत उभे राहून त्याचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचे मोठे कार्य केले जाते. शाळा भरताना आणि सुटताना राष्ट्रगीत, प्रार्थना किंवा राज्यगीताद्वारे विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे दिले जातात. “सावधान” हा शब्द ऐकताच विद्यार्थी शिस्तीत उभे राहतात, कारण त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच शिस्तीचे संस्कार बिंबवलेले असतात.

मात्र, सध्याच्या काळात शिस्तीचा धाक कमी होत चालल्याचे चित्र दिसून येते. विद्यार्थ्यांना कठोरपणे समज देणेही धोकादायक मानले जाऊ लागल्याने शाळांमधील शिस्त काही प्रमाणात सैलावली आहे. वर्गात शिक्षक उपस्थित असतानाही गोंधळाचे प्रकार वाढताना दिसतात. त्याचा परिणाम राष्ट्रगीतासारख्या गंभीर बाबींवरही होत आहे.

विशेषतः शाळा सुटताना किंवा भरताना काही पालक राष्ट्रगीत सुरू असतानाही मोबाईलवर बोलणे, गप्पा मारणे किंवा शाळेच्या परिसरात विनाकारण फिरताना दिसतात. हे दृश्य विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम करणारे ठरते. मुले मोठ्यांचे अनुकरण करतात आणि त्यामुळे शिस्तीबाबत चुकीचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतो.

राष्ट्रगीताचा सन्मान करणे हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक आणि राष्ट्रीय धर्म आहे. त्यामुळे शाळांनी पालकांमध्येही जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. शाळांच्या प्रवेशद्वारांवर “राष्ट्रगीत सुरू असताना शिस्तीत उभे राहा” असे फलक लावणे, सतत सूचना देणे आणि पालकांना याबाबत संवेदनशील करणे गरजेचे आहे.

जपानसारख्या शिस्तप्रिय देशांमध्ये राष्ट्रगीताचा किती आदर केला जातो याची उदाहरणे जगासमोर आहेत. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ निर्माण झाल्यास राष्ट्रगीत सुरू होताच लोक शांत आणि सावधान होतात. हीच खरी शिस्त आणि संस्कारांची ताकद आहे.

ज्याप्रमाणे आपण राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान करतो, त्याचप्रमाणे राष्ट्रगीत आणि शिस्त यांचाही आदर करणे आवश्यक आहे. शिस्त, राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना प्रत्येक नागरिकामध्ये निर्माण झाली तरच देश खऱ्या अर्थाने महान होईल.

Previous Post

एक हजार रुपयांची लाच घेताना विद्युत कर्मचारी जाळ्यात

Next Post

मुरखळा नजीक भीषण बस अपघात; दोन ठार, अनेक जखमी — चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
8
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
17
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
22
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
8
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
मुरखळा नजीक भीषण बस अपघात; दोन ठार, अनेक जखमी — चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक

मुरखळा नजीक भीषण बस अपघात; दोन ठार, अनेक जखमी — चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In