• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ उत्साहात साजरा
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

शहादा, दि. २१ :
येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ संचलित के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालयात ‘जागतिक मधमाशी दिवस’ विविध उपक्रमांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

महाविद्यालयाच्या कीटकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश शेती आणि मानवी जीवनातील मधमाश्यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा होता.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पटेल होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यात मधमाश्यांचे अनन्यसाधारण योगदान स्पष्ट केले. “मधमाश्या केवळ मध उत्पादनासाठी महत्त्वाच्या नसून, परागीभवन प्रक्रियेमुळे शेती उत्पादन वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असतो. त्यामुळे मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. के. एस. पाटील आणि प्रा. प्रशांत चंदिले उपस्थित होते. प्रा. के. एस. पाटील यांनी मधमाशी पालनातील आधुनिक तंत्रज्ञान, मधमाश्यांच्या विविध प्रजाती तसेच त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

तर प्रा. प्रशांत चंदिले यांनी कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मधमाश्यांच्या अस्तित्वावर निर्माण झालेल्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत चंदिले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृषी शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील आणि संचालक मयूरभाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous Post

शहाद्यात सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू राष्ट्र’ विषयावर २२ मे रोजी व्याख्यान

Next Post

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In