• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन
0
SHARES
118
VIEWS
Ad 1

सातारा | प्रतिनिधी
कामगार संघर्ष संघटनेच्या वतीने शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या मागणीसाठी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यालयासह जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार श्रीमती ऋतुजा कदम यांनी हे निवेदन स्वीकारले.

संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २५ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय व गायरान जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण व शहरी भागातील निवासी अतिक्रमणे विशिष्ट अटी व शर्तींच्या अधीन राहून नियमित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

तथापि, फलटण तालुक्यासह अनेक भागांतील गरीब व गरजू कुटुंबांना अद्याप मालकी हक्क अथवा शासन योजनांचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. ग्रामसेवक, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि संबंधित समित्यांमार्फत अर्ज स्वीकारून पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे आदेश असूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

संघटनेने शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गावस्तरावर तात्काळ सर्वेक्षण करावे, पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारून पोच द्यावी तसेच महसूल प्रशासन, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पंचायत समितीमार्फत संयुक्त छाननी करून पात्र नागरिकांची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली आहे.

तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत विनामूल्य मोजणी करून शहरी व ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना भोगवटादार वर्ग-२ हक्क प्रदान करावेत आणि कोणत्याही पात्र नागरिकावर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कामगार संघर्ष संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव अप्पा गायकवाड यांनी शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. “पात्र नागरिकांना त्यांचा हक्काचा लाभ मिळावा आणि अर्जांची कार्यवाही जलद व्हावी यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधला जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कामगार संघर्ष संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव अप्पा गायकवाड, उद्योजक अतुल मोरे आणि पत्रकार प्रशांत सोनवणे उपस्थित होते.

Previous Post

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

Next Post

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In