• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in ताज्या घडामोडी
0
वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा तीव्र रास्ता रोको आंदोलन
0
SHARES
84
VIEWS
Ad 1

हिंगोली | प्रतिनिधी
डीएपी खतांचा तुटवडा, बियाण्यांची हमी नसणे, डिझेलची कमतरता, कालव्यांत पाणी नसणे, बँकांमध्ये रोख रकमेची अडचण तसेच शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याच्या निषेधार्थ क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने वारंगा फाटा येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

संघटनेच्या वतीने दि. २१ मे रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनात शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनकर्ते आणि पोलिस प्रशासन यांच्यात काही काळ शाब्दिक चकमकही झाल्याचे सांगण्यात आले.

RelatedPosts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

आंदोलनकर्त्यांनी बाजारात डीएपी खत उपलब्ध नसल्याचा, कृषी केंद्रांवर बियाण्यांची हमी नसल्याचा तसेच पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसल्याचा आरोप केला. कालव्यामध्ये पाणी नसल्याने शेतीची कामे ठप्प होत असून, बँकांमध्ये शेतकऱ्यांना आवश्यक रोख रक्कम उपलब्ध होत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. हळदीसह इतर शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

संघटनेने शासनाकडे शेतकऱ्यांना तात्काळ डीएपी खत व बियाणे उपलब्ध करून देणे, ट्रॅक्टरसाठी डिझेलचा पुरेसा पुरवठा करणे, पिक विमा तातडीने वितरित करणे, शेतीमालाला योग्य हमीभाव देणे, कालव्यामध्ये पाणी सोडणे तसेच बेरोजगार तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याची मागणी केली.

“शासनाने तातडीने प्रश्न सोडवले नाहीत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिस प्रशासनाने काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तरीही संघटनेने आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली.

या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुका अध्यक्ष प्रवीण मते, कळमनुरी तालुका अध्यक्ष चैतन्य चव्हाण, राम चव्हाण, रमेश जाधव, गजानन काळे, शांतीराम सावके, ज्ञानेश्वर बोंढारे, सुभाषराव गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते.

Tags: Narayan Hake
Previous Post

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

Next Post

राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत

Related Posts

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
ताज्या घडामोडी

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026
66
ताज्या घडामोडी

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पोयनाड येथे भव्य रक्तदान शिबिर

August 20, 2026
5
ताज्या घडामोडी

वीज बिल ‘सेटल’ करण्यासाठी ८ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात

August 20, 2026
21
ताज्या घडामोडी

पालघरच्या औद्योगिक विकासाला मिळणार नवी दिशा; गुंतवणूक परिषदेतून रोजगारनिर्मितीला चालना

August 20, 2026
14
ताज्या घडामोडी

मोराणे समाजकार्य महाविद्यालयात राजीव गांधी जयंतीनिमित्त सद्भावना दिन; विचारप्रबोधन कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
24
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
179
Next Post
राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत

राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारीसाठी रमेश आडसकर यांचे नाव चर्चेत

ताज्या बातम्या

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

धावरी येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

August 20, 2026

नागपंचमीच्या मुहूर्तावर शेतकरी गटाचा जलसंधारणाचा उपक्रम; श्रमदानातून वनराई बंधारा उभारला

August 20, 2026

मानवतचे तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

August 20, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In