• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 22, 2026
in Blog
0
संभाजीनगर कॉलनीतील धोकादायक विद्युत तारा अखेर सुरक्षित; नागरिकांनी व्यक्त केला समाधानाचा श्वास
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

शहादा | प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्रमांक १२ मधील संभाजीनगर कॉलनी परिसरात गेल्या ८ ते १० वर्षांपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असलेल्या लोंबकळणाऱ्या विद्युत तारा अखेर सुरक्षित करण्यात आल्या आहेत. महावितरण विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अतिरिक्त विद्युत खांब उभारण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

संभाजीनगर कॉलनीतील श्री. बोरदेकर यांच्या घरासमोरील विद्युत खांबावरील तारा अत्यंत खाली झुकलेल्या अवस्थेत होत्या. पावसाळा आणि वादळी वाऱ्याच्या काळात या तारांमुळे मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. परिसरातील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

RelatedPosts

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

या गंभीर समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी भाजप शहराध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगरसेवक ज्ञानेश्वरभाऊ चौधरी, नगरसेविका सौ. भावना चंद्रभान कदम आणि डॉ. चंद्रभान कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे समस्या मांडली. यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींनी महावितरणचे शहर अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांच्याशी संपर्क साधून सातत्याने पाठपुरावा केला.

या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून महावितरण विभागाने या ठिकाणी अतिरिक्त नवीन विद्युत खांब उभारला. गुरुवारी नवीन खांबावर विद्युत तारा सुरक्षितपणे वर ओढून बसवण्यात आल्या. हे काम सुरू असताना ‘श्री शिवछत्रपती ग्रुप’चे प्रमुख विजुभाऊ चौधरी आणि डॉ. चंद्रभान कदम यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामाची पाहणी केली व संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सुटल्याने संभाजीनगर कॉलनीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी ज्ञानेश्वरभाऊ चौधरी, सौ. भावना कदम, डॉ. चंद्रभान कदम, विजुभाऊ चौधरी आणि अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांचे आभार मानले असून लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

Previous Post

शहादा शहर हद्दीतील बायपास रस्त्यांवरील पथदिवे अखेर सुरू; उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

Next Post

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

Related Posts

Blog

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
10
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!
Blog

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
19
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा
Blog

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026
26
Blog

धर्मपुरी ग्रामपंचायतीच्या समित्यांबाबत प्रश्नचिन्ह; तीन वर्षांनंतरही स्थापनेचा मुद्दा ऐरणीवर

October 4, 2026
9
फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले
Blog

फलटण ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ७१ हरवलेले मोबाईल शोधले

October 4, 2026
15
Blog

शिकलकरी समाजाच्या समस्या तहसीलदारांनी जाणून घेतल्या

October 4, 2026
4
Next Post
शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

शासकीय व गायरान जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी कामगार संघर्ष संघटनेचे निवेदन

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In