• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा
0
SHARES
10
VIEWS
Ad 1

जुन्नर : लोककलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्या व न्याय हक्कासाठी जुन्नर तहसील कार्यालय आणि पंचायत समिती कार्यालयावर “लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्य”च्या वतीने भव्य गजर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला व ग्रामीण भागातील लोककलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत २०२४ चे प्रस्ताव सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून जिल्ह्यांना पाठविण्यात आले असतानाही पुणे जिल्ह्यात अद्याप कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. इतर जिल्ह्यांमध्ये मानधन सुरू होऊन चार ते पाच महिने उलटले असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण कलावंतांना मानधनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

RelatedPosts

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

यावेळी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी लवकरच प्रलंबित त्रुटी दूर करून लोककलावंतांचे मानधन सुरू करण्याचे आश्वासन दिले. मात्र, मागण्या तातडीने मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर १०१ ताशा-ढोलांसह “काम बंद महागजर आंदोलन” छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी दिला.

या आंदोलनात अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना महाराष्ट्र राज्यचे निवड समिती अध्यक्ष अनिल सोनवणे हे शहापूर येथून हजारो महिलांसह सहभागी झाले होते. आंदोलन यशस्वी करण्यासाठी बाबुलाल शेख, बाळासाहेब शिरतार, संजय महाडिक, अक्षय अल्हाड, तोफिक इनामदार, सुनील बर्वे, सुनील थोरात, बन्सी त्रिभुवन, किशोर आडांगळे, नारायण पथवे, अर्जुन धिंदळे आदींसह अनेक कलावंत व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

अकोले तालुक्यातील अनेक लोककलावंतांनी पारंपरिक कला सादर करत आंदोलनाला वेगळे स्वरूप दिले. भीमराव पवार यांच्या “गणपती” कलाकृतीचे सादरीकरण झाले, तर स्वप्निल गायकवाड यांनी जागरण-गोंधळ सादर करून कलावंतांची व्यथा मांडली. खेमा पथवे, खंडू गांगड आणि विविध वाजंत्री मंडळांनीही कला सादरीकरण करत आंदोलनात सहभाग घेतला.

शिरपुंजे येथील महिला लेझीम पथक, भोजमाता महिला लेझीम पथक तसेच शहापूर-भिवंडी येथील टाळ पथक आणि भजनी मंडळांनी भर उन्हातही उत्साहाने सहभाग नोंदवला. महिला जिल्हाध्यक्ष विमलताई डोंगरे यांनी महिला कलावंतांना संघटित करून आंदोलनात सक्रिय भूमिका बजावली. निर्मलाताई सरोदे यांचेही विशेष योगदान लाभले.

तसेच दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळाचे मालक संजय महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले. सुमारे अडीच हजार लोककलावंतांच्या उपस्थितीत हे आंदोलन उत्स्फूर्त वातावरणात पार पडले. आंदोलनासाठी आलेल्या सर्व कलावंतांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली.

पत्रकार संदीप शितोळे यांनी लोककलावंतांच्या समस्या विविध माध्यमांतून मांडल्याबद्दल आयोजकांनी त्यांचे आभार मानले.

Previous Post

जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा

Next Post

शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

Related Posts

ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
18
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
87
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
26
कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला
ताज्या घडामोडी

कारंजा घाडगे तालुक्यात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला

October 5, 2026
0
Next Post
शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्षांची अचानक धडक; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In