• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in Blog
0
जुन्नर येथे लोककलावंतांचे गजर आंदोलन संपन्न; मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘महागजर आंदोलन’चा इशारा
0
SHARES
24
VIEWS
Ad 1

जुन्नर | प्रतिनिधी

लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जुन्नर तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर भव्य गजर आंदोलन करण्यात आले. भव्य लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्यच्या वतीने आयोजित या आंदोलनात महिला व ग्रामीण भागातील लोककलावंत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

RelatedPosts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेअंतर्गत २०२४ चे प्रस्ताव सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध जिल्ह्यांना पाठविण्यात आले असले, तरी पुणे जिल्ह्यात अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. इतर जिल्ह्यांमध्ये चार ते पाच महिन्यांपासून मानधन सुरू झाले असताना पुणे जिल्ह्यातील ग्रामीण लोककलावंतांना मानधनापासून वंचित ठेवले जात असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.

या मागण्यांसंदर्भात तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या त्रुटी दूर करून तातडीने मानधन प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गवनेरजी सरोदे यांनी इशारा देताना सांगितले की, “जर लोककलावंतांचे मानधन तातडीने सुरू झाले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर १०१ ताशा-ढोलांसह काम बंद ‘महागजर आंदोलन’ छेडण्यात येईल.”

या आंदोलनात अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटना महाराष्ट्र राज्यचे निवड समिती अध्यक्ष अनिल सोनवणे हे शहापूर येथून हजारो महिलांसह सहभागी झाले होते. तसेच बाबुलाल भाई शेख, बाळासाहेब शिरतार, संजय महाडिक, अक्षय अल्हाड, तोफिक इनामदार, सुनील बर्वे, सुनील थोरात, बन्सी त्रिभुवन, किशोर आडांगळे, नारायण पथवे, अर्जुन धिंदळे यांच्यासह अनेक कलावंत व पदाधिकारी उपस्थित होते.

मोर्चादरम्यान विविध लोककला सादरीकरणांनी आंदोलनाला वेगळीच रंगत आणली. भीमराव पवार व मानेरे यांची गणपती कलाकृती, स्वप्निल गायकवाड यांचे जागरण-गोंधळ सादरीकरण, तसेच खेमा पथवे आणि खंडू गांगड यांच्या कलाप्रस्तुतींना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिरपुंजे येथील महिला लेझीम पथक, भोजमाता महिला लेझीम पथक तसेच शहापूर-भिवंडी येथील टाळ पथक आणि भजनी मंडळांनीही आपली कला सादर करत शासनाचे लक्ष वेधले.

लोककलावंत सांस्कृतिक विचार मंच महाराष्ट्र राज्यच्या महिला जिल्हाध्यक्ष विमलताई डोंगरे यांनी महिला कलावंतांना संघटित करून मोर्चात सक्रिय सहभाग नोंदवला. निर्मलाताई सरोदे यांचेही विशेष योगदान लाभले.

या मोर्चासाठी दत्ता महाडिक पुणेकर तमाशा मंडळाचे मालक संजय महाडिक यांचे विशेष सहकार्य लाभले. सुमारे अडीच हजार लोककलावंतांच्या उपस्थितीत आंदोलन उत्साहात पार पडले. मोर्चासाठी आलेल्या सर्व कलावंतांसाठी भोजन व्यवस्थाही करण्यात आली.

Previous Post

त्रिमूर्ती नगरामध्ये विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

Next Post

लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा

Related Posts

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
7
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
193
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
44
Next Post
लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा

लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी जुन्नरमध्ये गजर आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास महागजर आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In