• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आदई सर्कल येथील क्रिकेट थीम हटवण्याची मागणी; अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
आदई सर्कल येथील क्रिकेट थीम हटवण्याची मागणी; अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा
0
SHARES
45
VIEWS
Ad 1

पनवेल | प्रतिनिधी

नवीन पनवेल येथील आदई सर्कल येथे उभारण्यात आलेल्या क्रिकेट थीमविरोधात स्थानिक नागरिक व क्रांतिवीरप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आदई सर्कलला आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्यात आलेले असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून क्रिकेट थीम उभारण्यात आल्याने महापुरुषांचा अवमान होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक केवल महाडिक यांनी यासंदर्भात पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात येत्या १५ दिवसांच्या आत सदर क्रिकेट थीम हटवून त्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित स्मारक अथवा माहितीपट उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा आदई सर्कल येथे पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके हे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर इंग्रजांविरोधात संघटित सशस्त्र लढा उभारणारे ते पहिले मोठे क्रांतिकारक होते. रायगड जिल्ह्यातील शिरढोण येथे जन्मलेल्या फडके यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात रामोशी, कोळी, धनगर व इतर समाजघटकांना एकत्र करून स्वराज्यासाठी संघर्ष उभारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले.

इंग्रज सरकारने त्यांना अटक करून एडनच्या तुरुंगात ठेवले होते. तेथेच १७ फेब्रुवारी १८८३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या बलिदानामुळे पुढील अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली.

दरम्यान, आदई सर्कल येथे दिलीप वेंगसकर क्रिकेट अकॅडमीच्या नावाने उभारण्यात आलेली क्रिकेट थीम हटवून त्या ठिकाणी क्रांतिवीरांच्या जीवनकार्यावर आधारित थीम उभारावी, अशी मागणी नागरिकांकडूनही करण्यात येत आहे.

Tags: Shrinath Laad
Previous Post

23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन

Next Post

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
4
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
0
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
21
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
3
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
93
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
37
Next Post
पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

पुणे-पिंपरी चिंचवड परिसरात मुसळधार पाऊस; नागरिकांची तारांबळ

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In