• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 23, 2026
in Blog
0
23 मराठा बटालियनचे सेवा निवृत्त कॅप्टन जीवराज दशरथ खैरनार यांचे दुःखद निधन
0
SHARES
8
VIEWS
Ad 1

मालेगाव तालुका | प्रतिनिधी

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील रहिवासी तसेच 23 मराठा बटालियनमधील सेवा निवृत्त ऑर्डिनरी कैप्टन कैलासवासी जीवराज दशरथ खैरनार यांचे रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 7.01 वाजता राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे माजी सैनिक, मित्रपरिवार तसेच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

जीवराज दशरथ खैरनार यांनी आपल्या सैन्य सेवेमध्ये तब्बल 32 वर्षे देशसेवा बजावत 23 मराठा बटालियनमध्ये ऑर्डिनरी कैप्टन म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे कार्य केले होते. आपल्या कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि सेवाभावी स्वभावामुळे त्यांनी सैन्य दलात तसेच समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सैन्य सेवेदरम्यान त्यांनी अनेक जवानांना मार्गदर्शन केले असून देशसेवेसाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत परिसरातील युवकांना सैन्य भरतीसाठी प्रेरित केले. त्यांच्या शांत, मनमिळावू आणि मदतीस तत्पर स्वभावामुळे समाजात त्यांना विशेष मानाचे स्थान होते.

त्यांच्या पश्चात पत्नी सौ. निशा जीवराज खैरनार, मुलगा निखिल जीवराज खैरनार, मुलगी मोहिनी अमर पठारे तसेच जावई अमर शिवाजी पठारे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे खैरनार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या पार्थिवावर सोयगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी सैनिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

तसेच येत्या दिनांक 26 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे कैलासवासी जीवराज दशरथ खैरनार यांचा दहावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी ह.भ.प. गोविंद पवार महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती परिवाराकडून देण्यात आली आहे.

Previous Post

नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटी बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

आदई सर्कल येथील क्रिकेट थीम हटवण्याची मागणी; अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
2
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
1
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
8
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
11
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
5
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
199
Next Post
आदई सर्कल येथील क्रिकेट थीम हटवण्याची मागणी; अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

आदई सर्कल येथील क्रिकेट थीम हटवण्याची मागणी; अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In