• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
लातुरात बनावट सोन्याचे बिस्कीट विकणारी गँग जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, ८ गुन्हे उघड
0
SHARES
29
VIEWS
Ad 1

लातूर:
बनावट सोने दाखवून फसवणूक करणारी आणि गर्दीच्या ठिकाणाहून पैसे पळविणारी एक अट्टल टोळी लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी या टोळीतील तिघा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि बनावट सोन्याचे बिस्कीट जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या तब्बल आठ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्ह्यात मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख यांचे पथक तपास करत होते. २२ मे रोजी पोलिसांना बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, औसा-लातूर रोडवरील वासनगाव पाटी परिसरात तीन इसम सोन्याचे बनावट बिस्कीट विकण्यासाठी ग्राहकाच्या प्रतीक्षेत थांबले आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथक तयार करून संबंधित ठिकाणी छापा टाकला आणि संशयास्पद रित्या वावरणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे बाबाराव सूर्यकांत जाधव (वय ३०), केशव छगन जाधव (वय ५०) आणि संदीप दगडू जाधव (वय २९, सर्व रा. सलगरा, ता. जि. लातूर) अशी सांगितली. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे मणीमंगळसूत्र, रोख रक्कम आणि सोनेरी रंगाचे बनावट बिस्कीट आढळून आले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी फसवणूक आणि चोरी केल्याची कबुली दिली.

या टोळीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत चतुर होती. हे आरोपी महिलांना गाठून त्यांना “सोन्याचे बिस्कीट” स्वस्तात देण्याचा किंवा ते सापडल्याचा बहाणा करायचे आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे खरे मंगळसूत्र चोरून पसार व्हायचे. याशिवाय ही टोळी बसस्थानके, सरकारी रुग्णालय परिसर, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक कार्यालयांमध्ये नागरिकांच्या खिशातील व पिशवीतील रोख रक्कम चोरण्यातही सक्रिय होती. तपासादरम्यान अटक करण्यात आलेला आरोपी संदीप दगडू जाधव हा उदगीर शहर, औसा, देवणी, शिवाजीनगर आणि चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत फसवणुकीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये आधीपासूनच पोलिसांना पाहिजे असलेला मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या कारवाईत आरोपींकडून गांधी चौक, देवणी, अहमदपूर, शिवाजीनगर, कासार शिरसी, औसा, किनगाव आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांतील १ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गांधी चौक पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

सदरची यशस्वी कारवाई प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सूर्यकांत कलमे, संजय कांबळे आणि मोहन सुरवसे यांच्या पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील फसवणूक व चोरीच्या घटनांना मोठा आळा बसणार असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

Previous Post

उद्योग भवन परिसरास स्पेशल एज्युकेशन झोनची मान्यता मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – डॉ. अर्चनाताई पाटील चाकुरकर

Next Post

लायन्स क्लबचा “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार सोहळा व ‘काव्यरंग’ कवी संमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
5
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
11
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
17
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
223
Next Post

लायन्स क्लबचा “सन्मान कर्तृत्वाचा” पुरस्कार सोहळा व ‘काव्यरंग’ कवी संमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In