• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव
0
SHARES
64
VIEWS
Ad 1
Ad 1

लोणी | प्रतिनिधी –

लोणी गावात आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत अवैध दगड खाणपट्टा, क्रशर आणि दगड वाहतुकीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून अवैध खाणपट्टा, क्रशर आणि दगड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

ग्रामस्थांनी सांगितले की, गावातील दगड खाण, क्रशर आणि दगड वाहतुकीमुळे नागरिक, शेतकरी आणि परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. क्रशरमधून उडणारी धूळ शेतीवर साचत असल्याने पिकांचे नुकसान होत असून अनेक शेतजमिनींची उत्पादकता घटल्याची तक्रार ग्रामसभेत करण्यात आली. काही ठिकाणी जमीन नापीक होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली.

तसेच परिसरातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दगड वाहतुकीसाठी वापरण्यात येणारा लोणी-वाफगाव मार्ग हा रस्ता शाळा, मंदिर आणि शेती क्षेत्रालगत असल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांना सतत धोक्याचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.

या प्रकरणात सर्वप्रथम सुखदेव आढाव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ग्रामसभा ठराव, ग्रामपंचायत नोंदी आणि संबंधित कागदपत्रांच्या पडताळणीत अनेक विसंगती आढळल्याचे प्रशासनाच्या अहवालातून समोर आले आहे. ग्रामसभेतील ठरावाची नोंद ग्रामपंचायत इतिवृत्त नोंदवहीत नसल्याचे तसेच संबंधित अर्जाची आवक नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनीही संबंधित ठरावाची प्रत आपण दिली नसल्याचे जबाबात नमूद केले आहे.

दरम्यान, ग्रामसभेत खाण मालक आणि ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचेही समोर आले. खाण मालकाने शासनाकडे मोठ्या प्रमाणावर रॉयल्टी भरल्याचा तसेच ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतरच खाण आणि क्रशर व्यवसाय सुरू केल्याचा दावा केला. तसेच व्यवसायात मोठी आर्थिक गुंतवणूक केल्याचे सांगत भविष्यात खाणपट्टा बंद झाल्यास होणाऱ्या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला.

मात्र ग्रामस्थांनी यास ठाम विरोध दर्शवत ग्रामपंचायत किंवा गावकरी जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अवैध खाणपट्टा, क्रशर आणि दगड वाहतूक बंद न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या ग्रामसभेला आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध मान्यवर, वरिष्ठ नेते तसेच २५० ते ३०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही विशेष लक्षणीय होती. ग्रामसभेच्या अखेरीस सर्वांच्या एकमताने अवैध खाणपट्टा, क्रशर आणि दगड वाहतूक बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.

Ad 1
Tags: Tejas Walunj
Previous Post

पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले

Next Post

धर्मपुरी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण उत्साहात

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
धर्मपुरी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण उत्साहात

धर्मपुरी येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा कट्ट्याचे लोकार्पण उत्साहात

ताज्या बातम्या

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

October 9, 2026
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In