• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पाबळ–कनेरसर मार्गाची पुन्हा दुरवस्था; आंदोलने होऊनही डांबरीकरण रखडले
0
SHARES
19
VIEWS
Ad 1
Ad 1

पाबळ | प्रतिनिधी

पाबळ ते कनेरसर या मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून नागरिक, कामगार आणि वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजगुरूनगर–पाबळ मार्गावरील कनेरसर–पाबळ MIDC दरम्यानचा सुमारे सहा ते सात किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी व्यापला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

अवकाळी पावसामुळे रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले असून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण होत आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी पाबळ आणि कनेरसर येथे ग्रामस्थांनी दोन वेळा आंदोलने केली होती. आंदोलनानंतर प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले होते. तसेच संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र चार ते पाच महिने उलटूनही प्रत्यक्ष डांबरीकरणाचे काम सुरू झालेले नाही.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अनेक ठिकाणी रस्ता खचला असून वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हा रस्ता MIDC कडे जाणारा मुख्य मार्ग असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. ट्रक, कंटेनर आणि इतर जड वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे रस्त्याची अवस्था अधिकच खराब झाली आहे.

MIDC मधील कर्मचारी, शालेय विद्यार्थी, दुचाकीस्वार तसेच रोजंदारी करणाऱ्या कामगारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

“दोन वेळा आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, खड्डे बुजवले गेले; मात्र कायमस्वरूपी उपाय अजूनही झालेला नाही. प्रशासन आणि सरकारला जाग कधी येणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संघटना आणि वाहनचालकांकडून या रस्त्याचे तातडीने डांबरीकरण करून सुरक्षित प्रवासासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

Ad 1
Tags: Tejas Walunj
Previous Post

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ला मोठे यश

Next Post

लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव

लोणी ग्रामसभेत अवैध खाणपट्टा, क्रशर व दगड वाहतुकीविरोधात एकमुखी ठराव

ताज्या बातम्या

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न..

October 9, 2026
ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In