• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पंचगंगा नदीतील रासायनिक प्रदूषणाविरोधात आंदोलन तीव्र; ३ जूनपासून इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in ताज्या घडामोडी
0
पंचगंगा नदीतील रासायनिक प्रदूषणाविरोधात आंदोलन तीव्र; ३ जूनपासून इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

कुरुंदवाड | प्रतिनिधी –

पंचगंगा नदी मध्ये सोडल्या जाणाऱ्या रासायनिक दूषित पाण्याच्या प्रश्नावरून शिरोळ तालुक्यातील नागरिकांचा संताप तीव्र झाला असून इचलकरंजी महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित प्रोसेस उद्योगांविरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

“पंचगंगा नदीला मृत्यूवाहिनी बनविणारे रासायनिक पाणी कायमचे बंद करा, अन्यथा इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा रोखण्याशिवाय पर्याय राहणार नाही,” असा थेट इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमूंगे आणि राकेश जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून पंचगंगा नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी व रासायनिक पाण्याविरोधात विविध आंदोलने सुरू आहेत. मात्र प्रत्येकवेळी तात्पुरत्या स्वरूपात पाणी बंद करून पुन्हा काळ्या ओढ्यातून प्रदूषित पाणी नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला.

“इचलकरंजीच्या औद्योगिक सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचा जीव घेतला जात आहे. शिरोळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

माहितीनुसार, प्रोसेस उद्योगांकडे सांडपाणी व्यवस्थापनासाठी आवश्यक जमीन उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही निर्बंध लागू केले होते. तरीही अनेक प्रोसेस उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून काळ्या ओढ्यातून थेट रासायनिक पाणी पंचगंगेत सोडत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

आंदोलनकर्त्यांनी सात प्रमुख मागण्या मांडल्या असून त्यामध्ये काळा ओढा पूर्णपणे बंद करणे, CETP प्रकल्प तात्काळ बंद करणे, चोरून सुरू असलेल्या प्रोसेस उद्योगांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, पार्वती आणि लक्ष्मी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाची चौकशी करणे तसेच इचलकरंजी महानगरपालिका च्या STP प्रकल्पातील पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, १ जून २०२६ पासून कुरुंदवाड येथे धरणे आंदोलन सुरू करण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास ३ जूनपासून इचलकरंजीचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“आम्हाला कोणाच्याही पिण्याच्या पाण्यावर गदा आणायची नाही. मात्र आमच्या भागातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आता टोकाचा संघर्ष करावा लागणार आहे,” अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली.

यावेळी दीपक पाटील, बंडू बरगाले, प्रभाकर बंडगर, गोपाळ चव्हाण, रशीद मुल्ला, आनंदा भातमारे, संदीप चौगुले, बंटी माळी, सुनील सावंत, भारत ढाले, आयुब पट्टेकरी, प्रकाश बावडेकर, मंगेश नलवडे, विश्वास बालिघाटे, अविनाश पाटील आदी उपस्थित होते.

Ad 1
Tags: Darikant Kolekar
Previous Post

धाराशिवमध्ये राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी ‘मास्टरस्ट्रोक’; विधान परिषदेसाठी राहुल मोटे यांच्या नावाची जोरदार चर्चा!

Next Post

यश अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
59
Next Post
यश अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

यश अकॅडमीतर्फे यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा भव्य सत्कार सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In