• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिद्द, चिकाटी आणि सेवाभावातून उभी राहिलेली यशोगाथा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 24, 2026
in Blog
0
0
SHARES
12
VIEWS
Ad 1
Ad 1

डॉ. कलवले संजय नागनाथ यांचा प्रेरणादायी प्रवास

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील जळकोट येथील डॉ. कलवले संजय नागनाथ हे गेल्या तब्बल २५ वर्षांपासून पशुसेवा करत शेतकरी व सर्वसामान्यांच्या सेवेत कार्यरत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक मेहनतीच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र घर उभे केले. त्यांची ही संघर्षमय आणि प्रेरणादायी यशोगाथा अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.

डॉ. संजय कलवले यांनी आयुष्यभर शेतकरी, व्यापारी, शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, फार्मासिस्ट तसेच सर्व धर्मीय लोकांना एकत्र घेऊन समाजात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. “पशु सेवा हीच ईश्वर सेवा” हे ब्रीद मनात ठेवून त्यांनी हजारो जनावरांवर उपचार करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

जनावरांचे आजार, आग बाहेर येणे, जनावर आडणे, सर्पदंश, फर्या रोग, घटसर्प यांसारख्या गंभीर आजारांवर योग्य व खात्रीशीर उपचार करून अनेक मुक्या जनावरांना जीवदान देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी दिवस-रात्र धावून जाणे ही त्यांची ओळख बनली आहे. कोणाचाही फोन किंवा मिसकॉल आला तरी तात्काळ संपर्क करून त्यांची विचारपूस करणे आणि शक्य ती मदत करणे हा त्यांचा स्वभाव आहे.

अत्यंत साधी परिस्थिती असताना त्यांनी स्वतःचा छोटासा प्लॉट खरेदी केला आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. या यशामागे त्यांच्या सासूबाई सौ. सुमनबाई बालाजी गौतम (रा. सेलू आंबा, ता. आंबाजोगाई, जि. बीड) यांची मोठी आर्थिक व मानसिक साथ लाभली. त्यांच्या सहकार्यामुळेच घराचे स्वप्न पूर्णत्वास आले, अशी भावना डॉ. कलवले यांनी व्यक्त केली.

तसेच सद्गुरू माऊली दादा चाकरवाडीकर, माऊली नामदेव दापकेकर यांच्या कृपा-आशीर्वादामुळे आणि संतसंगाच्या सहवासामुळे जीवनाला नवी दिशा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनमुक्त जीवन, प्रामाणिक मेहनत आणि चिकाटी यांच्या बळावरच आज हे यश मिळाल्याचे ते नम्रपणे सांगतात.

“एक वीट पांडुरंगाच्या भक्तीची,
एक वीट संतांच्या कृपेची,
एक वीट आई-वडिलांच्या संस्कारांची,
एक वीट पत्नीच्या सहकार्याची,
आणि आता हवी आहे एक वीट आपल्या शुभआशीर्वादाची…”

अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाची भावना व्यक्त केली आहे. समाजसेवा, पशुसेवा आणि माणुसकी जपणाऱ्या डॉ. संजय कलवले यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Ad 1
Tags: Sanjay Kalwale
Previous Post

श्रीक्षेत्र चौंडी येथे १२६० कोटींच्या विकासकामांचा भव्य भूमिपूजन सोहळा; ३१ मे रोजी मान्यवरांची उपस्थिती

Next Post

🚲 १०० सायकली, १०० स्वप्ने!

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
233
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
18
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
🚲 १०० सायकली, १०० स्वप्ने!

🚲 १०० सायकली, १०० स्वप्ने!

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In