• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ग्रामीण पटसंख्येच्या सवलती शहरात लागू कराव्यात; विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याची मागणी — मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in Blog
0
ग्रामीण पटसंख्येच्या सवलती शहरात लागू कराव्यात; विदर्भातील शाळा 26 जूनपासून सुरू करण्याची मागणी — मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

नागपूर | प्रतिनिधी

शिक्षण क्षेत्रातील विविध ज्वलंत प्रश्नांवर भाजप शिक्षक आघाडी पूर्व विदर्भाचे अध्यक्ष अनिल महादेवराव शिवणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथील रामगिरी बंगल्यावर भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

RelatedPosts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

या भेटीदरम्यान त्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या 11 मे 2026 च्या शासन पत्रानुसार ग्रामीण व दुर्गम भागातील इयत्ता 9 वी व 10 वी साठी लागू असलेली 20 पटसंख्या व 3 शिक्षकांची अनुज्ञेयता ही सवलत शहरातील शाळांनाही लागू करावी, अशी मागणी केली. यामुळे शहरातील मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळांना संरक्षण मिळेल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले.

तसेच विदर्भातील उष्णतेचा विचार करता शाळा 15 जूनऐवजी 26 जूनपासून सुरू कराव्यात, समावेशित शिक्षण योजनेंतर्गत 963 विशेष शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन करावे, तसेच समग्र शिक्षा अभियानातील 3200 कर्मचाऱ्यांचे समायोजन त्याच विभागात करावे, अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.

जनगणना कार्यासाठी केलेल्या सेवेमुळे अर्जित रजा रोखीकरणाचा शासन निर्णय, दीर्घकाळ मानधनावर कार्यरत कला, क्रीडा व इतर शिक्षकांचे समायोजन, तसेच पदवीधर शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबतही चर्चा झाली. विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तके वेळेत मिळावीत, यावरही भर देण्यात आला.

या सर्व मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे शिवणकर यांनी सांगितले.

दरम्यान, 9 वी व 10 वी वर्गासाठी 20 पटसंख्या लागू करण्याबाबतच्या अंमलबजावणीतील अडचणी, शिक्षक समायोजन व वेतन प्रक्रियेतील विलंब यावरही निवेदनात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. शाळांमध्ये टीसी देणे, प्रवेश प्रक्रिया, शिक्षकांचे समायोजन आणि शालार्थ प्रणालीतील अडचणींमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Ad 1
Previous Post

श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांना पाच वर्षांची पदच्युती; सहाय्यक धर्मदाय आयुक्त नांदेड यांचा आदेश

Next Post

ढगा-राहाटी जंगलात ‘राणी पार्वती’ वाघिणीचे अधिराज्य; तीन बछड्यांना शिकवतेय शिकारीचे धडे

Related Posts

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!
Blog

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
235
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप
Blog

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026
19
Blog

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026
15
आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !
Blog

आळंदीच्या “सिद्धबेटात“ फुलणार वनराई !

October 10, 2026
13
मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.
Blog

मौजे नाव्हा तालुका पालम जिल्हा परभणी येथील नागरिकांना पाणीटंचाई भेडसावत आहे.

October 10, 2026
30
Blog

२०१७ पासून फरार असलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी श्रीगोंद्यातून जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई

October 10, 2026
32
Next Post
ढगा-राहाटी जंगलात ‘राणी पार्वती’ वाघिणीचे अधिराज्य; तीन बछड्यांना शिकवतेय शिकारीचे धडे

ढगा-राहाटी जंगलात ‘राणी पार्वती’ वाघिणीचे अधिराज्य; तीन बछड्यांना शिकवतेय शिकारीचे धडे

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In