• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
0
SHARES
72
VIEWS
Ad 1
Ad 1

डम्पिंग ग्राऊंडजवळ भीषण अपघात, चालक ताब्यात

पुसद | वार्ताहर

पुसद शहराजवळील इंदिरानगर परिसरातील डम्पिंग ग्राऊंडजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली. भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मृतांमध्ये अरविंद प्रल्हाद राठोड (वय ४०, रा. कोठारी ता. महागाव) आणि गणेश विष्णू जाधव (वय २९, रा. काटखेडा) यांचा समावेश आहे. गणेश जाधव हे होमगार्ड जवान असून पुसद येथील फुलसिंग नाईक महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी आले होते.

या अपघातात अरविंद राठोड यांच्या पत्नी अनिता राठोड (वय ३५) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यावर पुसद उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच २९ बीई ७५७० क्रमांकाचा टिप्पर चालक भारत शंकर पवार (वय २८, रा. काटखेडा) याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दोन दुचाकींना धडक दिली. अपघात इतका भीषण होता की एका मृताचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला, तर दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर काही काळ परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले असून टिप्पर जप्त करण्यात आला आहे. संबंधित चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Ad 1
Tags: Vijay Baraskar
Previous Post

जामखेड नगर परिषदेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी; पांडुरंग माने यांचे साखळी उपोषण सुरू

Next Post

काँग्रेसमध्ये युवकांना संधी देणार; जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांची ग्वाही; यवतमाळात जल्लोषात स्वागत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
काँग्रेसमध्ये युवकांना संधी देणार; जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांची ग्वाही; यवतमाळात जल्लोषात स्वागत

काँग्रेसमध्ये युवकांना संधी देणार; जिल्हाध्यक्ष ॲड. सचिन नाईक यांची ग्वाही; यवतमाळात जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In