• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जामखेड नगर परिषदेला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची मागणी; पांडुरंग माने यांचे साखळी उपोषण सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड नगर परिषदेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. नामांतराच्या मागणीसंदर्भात अनेक वेळा निवेदने, पाठपुरावा आणि मागण्या करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून ठोस निर्णय होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, जामखेड तालुक्याला एक आमदार तसेच विधान परिषदेत दोन आमदारांचे प्रतिनिधित्व असतानाही नगर परिषद नामांतराच्या प्रश्नावर कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. नगर परिषद नामांतराचा प्रस्ताव प्रलंबित राहण्यामागे विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. तसेच, “आचारसंहिता लागू असताना जिल्हा परिषदेमधील बदल्या कशा होतात?” असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असून त्यांच्या नावाने नगर परिषदेला ओळख मिळणे ही जामखेडकरांसाठी अभिमानाची बाब ठरेल. मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्ष निर्णय घेतला जात नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपोषणस्थळी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि नागरिकांनी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. “अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या”, “जामखेड नगर परिषद नामांतराचा निर्णय तातडीने घ्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

प्रशासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण जामखेड तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पुढे कोणती भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ह.भ.प. विधीतज्ञ महारुद्र नागरगोजे, माजी जामखेड ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब श्रीरामे, माजी संचालक जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती सागर सदाफुले, सचिन काशीद, विकी पिंपळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Ad 1
Tags: Amrut Karande
Previous Post

बांधकाम कामगार योजना नावापुरतीच?

Next Post

भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

भरधाव टिप्परच्या धडकेत दोघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In