• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

खामगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खामगाव तालुका व शहर शाखेच्या वतीने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांबाबत शासनाकडे निवेदन सादर करण्यात आले.

तहसीलदार सुनील पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल कॅनमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच पेट्रोल पंपांवर उपलब्ध इंधन साठ्याची माहिती लेखी स्वरूपात लावावी, गॅस सिलेंडरसाठी लागणाऱ्या रांगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

यावेळी नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणावर संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याने संबंधित आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, असे आंदोलनकर्त्यांनी म्हटले.

निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे —

  • पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढीव दरांचा पुनर्विचार करावा.
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल कॅनमध्ये देण्यास परवानगी द्यावी.
  • नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी.
  • खत व बियाण्यांचा तुटवडा टाळून शेतकऱ्यांना मुबलक पुरवठा करावा.
  • रखडलेली पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
  • पेट्रोल व डिझेल पंपांवरील उपलब्ध साठ्याची माहिती सार्वजनिक करावी.

या सर्व मागण्या तातडीने मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार, शहरप्रमुख रवि जैन, ज्येष्ठ शिवसैनिक सुभाष ठाकूर, युवा सेना तालुका प्रमुख राहुल मानमोडे, उपतालुकाप्रमुख प्रकाश पवार, मोहनसिंग इंगळे, हेमंत खारोडे, विभागप्रमुख रामेश्वर लाहुडकर, शाखाप्रमुख ज्ञानदेव रोटे, सुनील नेमाडे, दीपक कांबळे, संतोष सांगळे, संदीप केव्हारे, मोतीराम गावंडे, संजय बुंदे, शुभम बावस्कार, पवन भाऊ, अजय दुतोंडे यांच्यासह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 1
Previous Post

आदर्श ग्रामपंचायत पाथ्रड गोळेचा राज्यस्तरीय गौरवाकडे प्रवास; मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात प्रथम क्रमांक

Next Post

जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
58
Next Post
जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात

जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात

ताज्या बातम्या

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे, कवठे महांकाळ पोलिसांकडून विशेष मार्गदर्शन

October 8, 2026
जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

जांबिया आश्रमशाळेच्या प्रश्नाला यश!

October 8, 2026
पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

पी.व्ही.पी. मध्ये अभिजात मराठी ग्रंथ प्रदर्शन व विशेष व्याखान

October 8, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In