• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 26, 2026
in ताज्या घडामोडी
0
जिंतूर-सेलू मतदारसंघातील जनसामान्यांचा बुलंद आवाज; विजयराव भांबळे यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी जोरात
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

परभणी | प्रतिनिधी :

जिंतूर-सेलू मतदारसंघात गेल्या चार दशकांपासून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे ज्येष्ठ नेते विजयरावजी भांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परभणी-हिंगोली विधानपरिषदेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्ते व नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या विजयराव भांबळे यांनी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. मतदारसंघातील विविध विकासकामे, जनआंदोलने आणि पक्ष संघटन मजबूत करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे.

स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभलेले तसेच माजी मंत्री माणिकराव भांबळे यांच्या राजकीय व सामाजिक वारशाची परंपरा पुढे नेणारे नेतृत्व म्हणून विजयराव भांबळे यांच्याकडे पाहिले जाते. जिंतूर-सेलू परिसरात त्यांचे मजबूत जनसंपर्क जाळे असून सामान्य कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक ही त्यांची मोठी ताकद मानली जाते.

प्रत्येक संकटात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी परभणी-हिंगोली विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना संधी द्यावी, अशी भावना समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.

राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या विजयराव भांबळे यांच्या नावाची चर्चा सध्या जिल्ह्यात चांगलीच रंगू लागली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण, पक्षनिष्ठा आणि दीर्घकाळाचा जनसंपर्क यामुळे ते विधानपरिषदेकरिता सक्षम उमेदवार ठरू शकतात, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणाला संधी दिली जाणार याकडे परभणी व हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागले असून “भावी परभणी-हिंगोली विधानपरिषद आमदार” म्हणून विजयराव भांबळे यांच्या नावाची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहे.

Ad 1
Tags: RAmesh Mulgir
Previous Post

इंधन दरवाढ, गॅस टंचाई व नीट पेपरफुटी प्रकरणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खामगावात आंदोलन

Next Post

पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

पेरणोलीतील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवले; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In