• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 27, 2026
in ताज्या घडामोडी
0
कणकवली सेतू सुविधा केंद्रातील गैरसोयीवरून माजी आमदार वैभव नाईक आक्रमक
0
SHARES
10
VIEWS
Ad 1
Ad 1

नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहून अधिकाऱ्यांना फैलावर

“सर्वांची कामे पूर्ण झाल्याशिवाय केंद्र बंद करू नका” – वैभव नाईक

कणकवली | प्रतिनिधी | दि. २६ मे

कणकवली तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात नागरिकांची होत असलेली गैरसोय पाहून कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक चांगलेच आक्रमक झाले. गुजरात इन्फोटेक लिमिटेड कंपनीमार्फत चालविण्यात येणाऱ्या या सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्रे व इतर कागदपत्रांसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यावरून वैभव नाईक यांनी कंपनीचे व्यवस्थापक श्री. पावसकर यांना कडक शब्दांत जाब विचारला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिज्ञापत्रांसाठी केंद्रात केवळ एकच टेबल सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते. अनेक नागरिक विविध गावांतून कणकवली तहसील कार्यालयात आले होते. दुपारी २ वाजता सेतू सुविधा केंद्राचा दरवाजा बंद केला जात असल्याची तक्रार नागरिकांनी वैभव नाईक यांच्याकडे केली.

यावर संतप्त होत वैभव नाईक यांनी, “रांगेत उभ्या असलेल्या सर्व नागरिकांची कामे पूर्ण झाल्याशिवाय सेतू सुविधा केंद्र बंद करायचे नाही,” असा स्पष्ट इशारा व्यवस्थापनाला दिला. तसेच नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

तहसीलदारांवरही नाराजी

नागरिकांची मोठी गर्दी आणि गैरसोय सुरू असताना तहसीलदार मात्र केबिनमध्ये बसून ए.सी.ची हवा घेत असल्याचा आरोप करत वैभव नाईक यांनी प्रशासनावरही नाराजी व्यक्त केली. “नागरिकांना दाखले व प्रतिज्ञापत्रांसाठी चार-चार दिवस हेलपाटे मारावे लागत आहेत. महसूल विभागाने आधी ही परिस्थिती सुधारली पाहिजे,” असे ते म्हणाले.

विशेष म्हणजे, नागरिकांची रांग शौचालयाजवळ लावण्यात आल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. एवढ्या गंभीर परिस्थितीत अधिकारी मात्र नागरिकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

“मी पुन्हा येऊन पाहणी करणार”

यावेळी वैभव नाईक यांनी व्यवस्थापक श्री. पावसकर यांना, “तुम्ही कोणत्या उपाययोजना केल्या हे पाहण्यासाठी मी पुन्हा दुपारी ३ वाजता येथे येणार आहे,” असेही स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर सेतू सुविधा केंद्रातील कामकाजाला वेग आला आणि उपस्थित नागरिकांची प्रतिज्ञापत्रे व दाखले सायंकाळपर्यंत पूर्ण करून देण्यात आले.

यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र संपूर्ण गोंधळ आणि गर्दी सुरू असतानाही तहसीलदार शेवटपर्यंत बाहेर न आल्याने नागरिकांनी त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली.

पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, “महसूल विभागाकडून घरपोच सेवा देण्याच्या घोषणा केल्या जातात, पण प्रत्यक्षात नागरिकांना साध्या कामांसाठी अनेक दिवस त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे.”

Ad 1
Tags: Amit Tendulakr
Previous Post

“समस्या न सुटल्यास वीज अधिकाऱ्यांना गावात फिरू देणार नाही”; वीज ग्राहक संघटना आक्रमक

Next Post

कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

कन्नड तालुक्यासाठी ऐतिहासिक घोषणा; शेतकऱ्यांनी जमीन दिल्यास कन्नडमध्ये भव्य MIDC उभारणार – उद्योगमंत्री उदय सामंत

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In