• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’ संघटनेचा मोर्चा, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
May 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
१४५ आदिवासी आधारविना; पोशेरा ग्रामपंचायतीवर ‘श्रमजीवी’ संघटनेचा मोर्चा, प्रशासनाचे लेखी आश्वासन
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

पालघर | प्रतिनिधी :
“देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, तरी आम्हा गरिबांना अजून आधार कार्डही मिळू नये का?” असा संतप्त सवाल करत पोशेरा ग्रामपंचायतीवर श्रमजीवी संघटनेच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. भीषण उन्हात हातात झेंडे घेऊन शेकडो आदिवासी कातकरी बांधव आंदोलनात सहभागी झाले होते. अनेक माता-भगिनी आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन तासन्तास उन्हात उभ्या असल्याचे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले.

मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आधार कार्डसह गावातील पाणीटंचाई, ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत नळ योजनेची स्थिती, रोजगार हमी योजना आणि मागील काही वर्षांतील विकासकामांचा हिशोब प्रशासनाकडे मागितला. पोशेरा ग्रामपंचायत हद्दीतील शून्य ते सतरा वर्षे वयोगटातील तसेच अठरा वर्षांवरील मिळून सुमारे २०० आदिवासी नागरिक आधार कार्डपासून वंचित असल्याचा गंभीर मुद्दा संघटनेने उपस्थित केला.

RelatedPosts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

तब्बल तीन तास संबंधित अधिकारी जागेवर अनुपस्थित राहिल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलनाचा वाढता दबाव लक्षात घेऊन अखेर ग्रामसेवक मंगेश पाटील आणि स्थानिक सरपंच यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.

यावेळी वंचित १४५ नागरिकांना तातडीने आधार कार्ड मिळवून देण्याचे तसेच गावातील तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, दिलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेने दिला आहे.

या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष अंकुश वड, मोखाडा तालुका निरीक्षक रघुनाथ चौधरी, तालुका अध्यक्ष ईश्वर बांबरे, तालुका सहसचिव रामदास वाघ, माजी तालुकाध्यक्ष पांडू मालक, संदीप पागारी यांच्यासह अनिल वाघ, विनोद वळवी, गोकुळा वळवी आणि शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 1
Tags: Saurabh Kamdi
Previous Post

माहूर शहरात बकरी ईद उत्साहात साजरी; देशात अमन-शांतीसाठी विशेष प्रार्थना

Next Post

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; चौकशी व कारवाईची मागणी

Related Posts

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
9
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
4
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
25
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!
ताज्या घडामोडी

आढळगावात शरद जमदाडे-उत्तम राऊत यांच्या पॅनलचा ऐतिहासिक ‘क्लीन स्वीप’!

October 5, 2026
105
तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन
ताज्या घडामोडी

तेजस्विनी बर्गे यांची ‘ओंकार शुगर ग्रुप’च्या CEO पदी निवड; बाबूराव बोत्रे-पाटील व ओमराजे बोत्रे यांच्याकडून अभिनंदन

October 5, 2026
60
Next Post
एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; चौकशी व कारवाईची मागणी

एमएसईबी लाईनच्या कामाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल; चौकशी व कारवाईची मागणी

ताज्या बातम्या

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

🏏 मळदच्या मृण्मयीची राष्ट्रीय क्रिकेटला भरारी!

October 10, 2026
जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

जिरेगाव येथे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जैविक खते व कीटकनाशकांचे वाटप

October 10, 2026

नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा देवी मंदिरात विविध उपकरणाचे आयोजन

October 10, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In