• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आक्षी शिलालेख : मराठीचा प्राचीन पुरावा आणि आगरी बोलीचा ऐतिहासिक वारसा

Rudra by Rudra
May 31, 2026
in ताज्या घडामोडी
0
आक्षी शिलालेख : मराठीचा प्राचीन पुरावा आणि आगरी बोलीचा ऐतिहासिक वारसा
0
SHARES
1
VIEWS
Ad 1

पत्रकार कैलासराजे घरत. खारपाडा पेण. अलिबाग येथील आक्षी शिलालेख त्यातील मराठीचा पहिला पुरावा आणि आगरी बोलीचा प्राचीन वारसा
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक जडणघडणीत आणि मराठी भाषेच्या उगमात रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अलिबाग जवळील ‘आक्षी’ गावात सापडलेला १००० वर्षांहून जुना शिलालेख हा केवळ मराठी भाषेतील सर्वात प्राचीन शिलालेखांपैकी एक मानला जात नाही, तर तो आपल्या स्थानिक ‘आगरी बोलीच्या’ प्राचीनत्वाचा आणि तिच्या समृद्धीचा भक्कम पुरावा देतो.

RelatedPosts

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

पश्चिम किनारपट्टीवर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्याचा राजा ‘केसिदेव’ याच्या काळातील हा शिलालेख आहे. या शिलालेखातील शब्दरचना आणि आजची आगरी बोली यांचा तौलनिक अभ्यास केल्यास अंगावर काटा आणणारा इतिहास उलगडतो.
काय आहे आक्षीच्या शिलालेखात?
आक्षी येथील या शिलालेखावर देवनागरी लिपीत खालीलप्रमाणे मजकूर कोरलेला आहे:


“ॐ स्वस्ति ऱ्ही शकु संवतु ९३४ प्रधावी संवत्सरे: मार्गसिर सुध भृगुवारी भूर्ज म्हीय पसीचीम समुद्राधिपती श्री कोकणा चक्रीवर्ती श्री केसिदेव राया महाप्रधाने भइर्जू सेणुई तसू मुद्र व्यापारे सीरीपोणुई आसी त द्वाकलीं देवी बहुइचिया सेला वीया सुक्रवाराचे भोअणा घाली ९ तां पालि ९ नऊ दिधली”
अर्थ: शके ९३४ प्रभव संवत्सरात, मार्गशीर्ष शुद्ध शुक्रवारी, पश्चिम समुद्राधिपती कोकण चक्रवर्ती श्री केसिदेव राया याचा महाप्रधान भइर्जू सेणुई याच्या मुद्रा व्यापारात देवीच्या उपासनेसाठी शुक्रवारी अन्नाची व्यवस्था केली.. आगरी बोली आणि शिलालेखातील शब्दांचे मोठे साम्य: हा शिलालेख मूळ मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो, पण त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरले गेलेले शब्द थेट आजच्या आगरी बोलीशी नाते सांगतात. आजही या भागात आगरी-कोळी समाजाची मोठी वस्ती आहे, आणि त्यांच्या रोजच्या बोलीभाषेत १००० वर्षांपूर्वीचे हे शब्द जिवंत आहेत. * ‘शकू’ शब्द: प्रमाण मराठीत आपण ‘शके’ असे म्हणतो (उदा. शके १९४५). मात्र, आगरी बोलीत आजही ‘शकू’ हाच शब्द वापरला जातो. शिलालेखाची सुरुवातच ‘शकु संवतु ९३४ अशी होते. महिन्यांची नावे: ‘मार्गशीर्ष’ या महिन्याला आगरी बोलीत ‘माघी’ किंवा ‘मार्गसिर’ बोलले जाते. शिलालेखात स्पष्टपणे ‘मार्गसिर’ असा उल्लेख आढळतो.


‘श’ ऐवजी ‘स’ चा वापर: आगरी बोलीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यात ‘श’ या व्यंजनाच्या जागी अनेकदा ‘स’ हे अक्षर वापरले जाते. जसे की, ‘प्रकाश’ ला परकास, ‘शुद्ध’ ला सुद म्हटले जाते. शिलालेखातही ‘शुद्ध’ ऐवजी ‘सुध’ आणि ‘शुक्रवार’ ऐवजी ‘सुक्रवारी’ असा हुबेहूब आगरी वळणाचा शब्द वापरण्यात आला आहे. इतकेच काय अलिबागमधील नागाव येथेही १३ व्या शतकातील एक शिलालेख सापडतो ज्यात ‘आगरी’ समाजाचा स्पष्ट उल्लेख आहे. आक्षीचा शिलालेख (शके ९३४) जसा आगरी बोलीच्या ‘भाषेच्या वळणाचा’ आद्य पुरावा देतो, तसाच हा नागावचा शिलालेख (शके १२८९) ‘आगरी’ समाजाच्या ऐतिहासिक अस्तित्वाचा आणि स्थानिक प्रशासनातील त्यांच्या महत्त्वाचा सर्वात मोठा आणि भक्कम लिखित पुरावा आहे. आक्षीचा हा शिलालेख आणि नागावचा पुरावा हे सिद्ध करतात की, आगरी बोली ही नक्कीच एक अतिप्राचीन बोली आहे. केवळ इतकेच नाही, तर काळानुरूप प्रमाण मराठी भाषा बदलत गेली असली, तरी आगरी बोलीने मूळ मराठीचे किंवा प्राकृत भाषेचे शुद्ध रूप अजूनही आपल्या अंगाखांद्यावर अभिमानाने टिकवून ठेवले आहे, असे म्हटल्यास ते अजिबात वावगे ठरणार नाही…सर्वेश रविंद्र तरे ( लेखक-आगरयान )

Tags: Kailas Gharat
Previous Post

उष्ण घाताचा संशय, वटफळीतील पाच वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.

Related Posts

ताज्या घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार मनीष मुथा यांना ‘संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार’ प्रदान

August 27, 2026
6
ताज्या घडामोडी

अमळनेर हादरले! टाकरखेड्यात पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची रेल्वेखाली सामूहिक आत्महत्या; एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत

August 27, 2026
15
ताज्या घडामोडी

खवशी तलावात बुडून बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू; मुलाला वाचवताना वडिलांचाही जीव गेला

August 27, 2026
3
ताज्या घडामोडी

ईद मिलादुन्नबी निमित्त अमळनेरात भव्य जुलूस; हजारो भाविकांचा सहभाग

August 27, 2026
5
ताज्या घडामोडी

सासवड येथे गणेशोत्सव व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

August 27, 2026
92
ताज्या घडामोडी

अकोला विमानतळासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू

August 23, 2026
12
Next Post
अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.

अकोला महानगर पालिका. हद्दवाढ विभागातिल उपनगर शिवणी,प्र.क्रं.14 मधिल नागरिक भोगत आहेत यातना,!नगर सेवक,वा प्रशासन एसीत मस्त.

ताज्या बातम्या

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

पाथरीत ‘राजमाता जिजाऊ’ बसचे लोकार्पण; आमदार सईद भैया खान यांच्या हस्ते उद्घाटन

August 30, 2026
लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

लाडकी बहीण योजना महाराष्ट्राचा दुहेरी आर्थिक घोटाळा ।

August 30, 2026

शिरूर-खेडच्या सीमावर्ती भागात ७४३ हेक्टरवर नवी MIDC; जमीन संपादनाला सुरुवात{ शिरूर तालुका प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा}

August 30, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In