• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा

Rudra by Rudra
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा
0
SHARES
4
VIEWS
Ad 1
Ad 1

श्रीक्षेत्र चौंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित मुख्य जयंती सोहळा व अभिवादन सभा आज श्रीक्षेत्र चौंडी येथे अभूतपूर्व जनसहभाग, भक्तिभाव आणि उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

या ऐतिहासिक सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे सर, उपमुख्यमंत्री मा. श्रीमती सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री मा. श्री. दत्तात्रय भरणे, माजी मंत्री मा. श्री. अण्णासाहेब डांगे, खासदार मा. श्री. रामराव वडकुते तसेच सर्व आमदार, विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर, भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री मा. श्री. जयकुमार गोरे तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती मा. ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी श्रीक्षेत्र चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. तसेच श्री अहिलेश्वर मंदिरात महाअभिषेक करून दर्शन घेतले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना मी नमूद केले की, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि वारशाचा गौरव करण्याचे ऐतिहासिक कार्य मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने केले आहे. अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे त्यांच्या कार्याचा गौरव अधिक व्यापक पातळीवर पोहोचला आहे.

तसेच नव्या पुणे-मुंबई कनेक्टिंग लिंकला वीर शिंग्रोबा यांचे नाव देण्याची मागणी यावेळी केली. चौंडी ही केवळ अहिल्यादेवींची जन्मभूमी नसून बहुजनांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारी प्रेरणादायी पुण्यभूमी असल्याचे अधोरेखित केले. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी झाली, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा ऐतिहासिक निर्णय हा इतिहासाचा सन्मान करणारा असल्याचे नमूद केले. तसेच भटक्या-विमुक्त समाजावरील ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची मागणी केली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन तो मार्गी लावावा, अशी विनंतीही यावेळी केली.

लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी न्याय, धर्म, लोककल्याण, जनसेवा आणि सुशासनाचा जो आदर्श निर्माण केला, त्या महान कार्याला कृतज्ञ अभिवादन करण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्र श्रीक्षेत्र चौंडी येथे नतमस्तक झाला.

Ad 1
Tags: Santosh Bhoge
Previous Post

अपघातग्रस्त युवक आणि पॅरालिसिस रुग्ण महिलेला सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांच्याकडून आर्थिक मदत

Next Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
8
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
31
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा – आ. बबनराव लोणीकर

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In