• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 1, 2026
in ताज्या घडामोडी
0
गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला
0
SHARES
2
VIEWS
Ad 1
Ad 1

गरीब शेतकरी कुटुंबातील रोहित जाधव यांची भारतीय सैन्यात निवड; गावाचा अभिमान वाढवला

नाशिक | प्रतिनिधी : सुनिल बोराडे

जिद्द, मेहनत आणि परिस्थितीवर मात करण्याची इच्छाशक्ती असेल तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेणीत गावातील रोहित संतोष जाधव होय. अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रोहित यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतीय सैन्य दलात स्थान मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण गावाचा अभिमान वाढवला आहे.

RelatedPosts

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रोहित यांचे वडील कै. संतू राजाराम जाधव यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. मात्र, या कठीण परिस्थितीत खचून न जाता रोहित यांनी शिक्षणासोबतच आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवले.

गरीबी, संघर्ष आणि अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. आपल्या आईचे कष्ट आणि कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते अखेर सत्यात उतरवले.

भारतीय सैन्य दलात निवड झाल्याने रोहित यांनी आपल्या दिवंगत वडिलांचे स्वप्न पूर्ण केले असून आईचा मान उंचावला आहे. त्यांच्या या यशामुळे शेणीत गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

रोहित जाधव यांचे यश हे ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

रोहित संतोष जाधव यांचे भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व देशसेवेसाठी शुभेच्छा! 🇮🇳💐👏

Ad 1
Tags: Sunil Borade
Previous Post

हिंगणघाट पोलिसांची ‘वॉश आउट’ मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई; १ लाख ९० हजारांच्या

Next Post

पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे

Related Posts

ताज्या घडामोडी

दुष्काळाच्या छायेत यंदाचा नवरात्रोत्सव; पिवंदळ बुद्रुकमध्ये साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा निर्णय

October 11, 2026
25
ताज्या घडामोडी

मध्य रेल्वेचा आसनगाव-कसारा मार्गावर १२ दिवसांचा मेगाब्लॉक

October 11, 2026
4
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल
ताज्या घडामोडी

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
14
ताज्या घडामोडी

रत्नागिरीत केमिस्ट असोसिएशनच्या ‘निर्भय पॅनेल’चा दणदणीत विजय

October 5, 2026
6
बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा
ताज्या घडामोडी

बुर्गीत अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण सभा

October 5, 2026
30
मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात
ताज्या घडामोडी

मालेगाव तालुक्यात शेतकरी त्रस्त! पैसे भरूनही दोन महिने उलटले, तरी सोलर पंप मिळेना; तुरीचे पीक धोक्यात

October 5, 2026
14
Next Post
पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे

पहेला–चोवा–आंभोरा रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आंदोलन; प्रशासनाकडून आश्वासनानंतर आंदोलन मागे

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In