• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 2, 2026
in Blog
0
सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब वरील अतिक्रमण हटविण्याची मागणी; वाई नगरपरिषदेला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा
0
SHARES
50
VIEWS
Ad 1

वाई | प्रतिनिधी –

वाई नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्वे क्रमांक 1101 व 1107-ब, ब्राह्मणशाही परिसरातील रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे तसेच पाणीपुरवठा विभागातील कामकाजाची चौकशी करावी, अन्यथा पंधरा दिवसांनंतर वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीने दिला आहे.

RelatedPosts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिटी सर्वे क्रमांक 1107-ब व 1101 येथील सुमारे 27.194 चौरस मीटर क्षेत्र रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित आहे. मात्र, या जागेवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एका सायकल विक्रीच्या व्यावसायिक दुकानाचे अतिक्रमण असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यापूर्वीही या संदर्भात तीन ते चार वेळा नगरपरिषदेकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. तसेच नगरविकास विभागामार्फतही अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

यासोबतच वाई नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व पाणीपुरवठा देखभालीसाठी ठेकेदार तेज ट्रेडर्स यांना देयके अदा करण्यात आल्याचे समोर आले. मात्र, संबंधित कामांचे अहवाल, छायाचित्रे किंवा प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याचे पुरावे उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

पाणीपुरवठा अधिकारी जाधव आणि संबंधित ठेकेदार यांच्यात संगनमत होऊन आर्थिक व्यवहार झाले असावेत, अशी शंका व्यक्त करत या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पंधरा दिवसांत अतिक्रमण हटविणे, चौकशी सुरू करणे व लेखी उत्तर देणे याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यास वाई नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. त्यानंतरही दखल न घेतल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेना जिल्हा संघटक विकास जाधव, तालुका संघटक मनोज सातपुते, युवक कार्याध्यक्ष आकाश गायकवाड, शहराध्यक्ष रणवीर परदेशी, युवक उपाध्यक्ष रोहित कवळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा महामोर्चा; विविध मागण्यांसाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Next Post

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; ३० जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Related Posts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
17
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान
Blog

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
15
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
Blog

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
63
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!
Blog

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
1
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला
Blog

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026
11
Blog

आचार्य टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 31, 2026
30
Next Post

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर; ३० जूनपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In