• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ; शेतरस्ता मोकळा करण्याच्या कारवाईस अडथळा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ; शेतरस्ता मोकळा करण्याच्या कारवाईस अडथळा
0
SHARES
81
VIEWS
Ad 1

देवळा | प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील दहिवड येथे तहसीलदारांच्या आदेशानंतरही शेतरस्ता मोकळा करण्याच्या कारवाईला अडथळा निर्माण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी घटनास्थळी गेलेल्या मंडळ अधिकारी व तलाठी यांना दमदाटी करून कारवाई रोखण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मिळालेल्या माहितीनुसार, गट क्रमांक ५१३ बं. ६ मधील जमीन ही शंकर भारती यांची वडिलोपार्जित शेतजमीन असून, गेल्या तीन वर्षांपासून त्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक असलेला वहिवाट रस्ता उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. या संदर्भात तहसीलदार, देवळा यांनी संबंधित रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईदरम्यान गणेश दत्तू देवरे, एकनाथ परशराम देवरे आणि निर्मला एकनाथ देवरे यांनी अडथळा निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या आदेशानंतरही रस्ता मोकळा न झाल्याने शंकर भारती व त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात त्यांनी देवळा तहसील कार्यालय तसेच देवळा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, येत्या १५ जूनपर्यंत शेतरस्ता मोकळा करून न दिल्यास संपूर्ण कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित शेतरस्ता मोकळा करावा तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय देवळा-चांदवड मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही या प्रकरणात लक्ष घालून शेतकरी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गरीब शेतकरी कुटुंबावर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी आणि रस्ता मोकळा करण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

जलस्रोत बळकटीकरणासाठी व्यापक उपाययोजना करा ; पाण्याचा अपव्यय टाळा

Next Post

खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी

खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In