• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
खान्देश एक्सप्रेसमध्ये मध्यरात्री आग; जर्जर कोच बदलण्याची मागणी
0
SHARES
33
VIEWS
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी

दादर–भुसावळ खान्देश एक्सप्रेसमध्ये ३ जून रोजी मध्यरात्री वातानुकूलित (AC) यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे जयकुमार रावल यांच्यासह अनेक प्रवासी रेल्वेत प्रवास करत होते. तसेच गाडीत मोठ्या संख्येने महिला, वृद्ध, आजारी आणि सर्वसामान्य प्रवासी उपस्थित होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित कोचमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन यांनी रेल्वे प्रशासनाच्या देखभाल आणि दुरुस्ती व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत, खान्देश एक्सप्रेसमधील कोच अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याचा आरोप केला. ताप्ती सेक्शनवरील गाड्यांमध्ये इतर विभागांच्या तुलनेत जुने व निकृष्ट दर्जाचे कोच वापरले जात असल्याची प्रवाशांची तक्रार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रविण महाजन, माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, जितू गिरासे, संजोग रामोळे, मनोज निकम, अक्षय चव्हाण, सुभाष धनगर, नरेंद्र कोळी, अनिकेत आव्हाड, दिनेश कर्नावट, हर्षल आव्हाड, संजय अग्रवाल आदी पदाधिकाऱ्यांनी दोंडाईचा रेल्वे स्थानकाचे मुख्य स्टेशन अधीक्षक विक्रमसिंह चौधरी यांना निवेदन सादर केले.

निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत:

  • खान्देश एक्सप्रेसमधील सर्व जर्जर कोच तात्काळ बदलून नवीन व सुरक्षित कोच उपलब्ध करावेत.
  • वातानुकूलित (AC) यंत्रणेसह सर्व तांत्रिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करावी.
  • ताप्ती सेक्शनवरील सर्व गाड्यांचे विशेष सुरक्षा व तांत्रिक ऑडिट करावे.
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना राबवाव्यात.

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने तातडीने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Previous Post

तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ; शेतरस्ता मोकळा करण्याच्या कारवाईस अडथळा

Next Post

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांना नागापूर ग्रामपंचायतीत अभिवादन

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In