• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जनतेचा नगराध्यक्ष थेट मदतीला; वादळी पावसानंतर रात्रभर रस्ते मोकळे करण्यासाठी आतिष (सोनू) बोरेले यांची धडपड

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
June 4, 2026
in Blog
0
0
SHARES
25
VIEWS
Ad 1

पांढरकवडा | प्रतिनिधी

पांढरकवडा शहरात ३१ मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील अनेक मुख्य रस्त्यांवर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती, तर अनेक घरांचेही नुकसान झाले. या नैसर्गिक संकटाच्या काळात नगर परिषद पांढरकवडाचे नगराध्यक्ष आतिष उर्फ सोनू बोरेले यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीसाठी मैदानात उतरून कार्य केले.

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वादळानंतर निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत नगराध्यक्ष बोरेले यांनी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह रात्रभर शहरातील विविध भागांत काम करत कोसळलेली झाडे हटवून रस्ते मोकळे करण्याचे काम युद्धपातळीवर केले. पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

याशिवाय, वादळामुळे विस्कळीत झालेला पाणीपुरवठा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठीही त्यांनी संबंधित विभागांशी सातत्याने समन्वय साधून प्रयत्न केले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या कार्यात नगरसेवक अनिल बोरेले, रुपेश कुटकलवार, भाजप शहराध्यक्ष बंटी जुवारे, शेखर जयस्वाल, राम पेगरलावार, बापू कुकसे तसेच समस्त मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

नगराध्यक्ष आतिष (सोनू) बोरेले यांनी यावेळी सांगितले की, “मी पांढरकवडा शहराचा लोकनियुक्त प्रथम नागरिक आहे. जनतेची सेवा आणि शहराचा विकास हेच माझे कर्तव्य असून, नागरिकांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मी सदैव तत्पर राहीन.”

त्यांच्या या कार्याची शहरातील विविध स्तरांतून प्रशंसा होत असून, संकटकाळात जनतेच्या मदतीसाठी धावून आलेल्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कौतुक केले जात आहे.

Previous Post

भिवंडीत गावठी दारूच्या अड्ड्यांवर धडक कारवाई; १० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Next Post

कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
6
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
4
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
44
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
8
Next Post
कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू

कोहजगाव ग्रामस्थांचा पुढाकार; गणपती विसर्जन खदानीतील गाळ काढण्याचे काम स्वखर्चाने सुरू

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In